जळगाव प्रतिनिधी | येथील डॉ. उल्हास पाटील विधी महाविद्यालयातर्फे आसोदा आणि भादली येथे कायदेविषयक जनजागृती करण्यात आली.
जिल्हा विधी प्राधिकरणाच्या निर्देशाने विविध गावांमध्ये कायदेविषयक जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे. या अनुषंगाने डॉ. उल्हास पाटील विधी महाविद्यालयातर्फे आज आसोदा आणि भादली या दोन गावांमध्ये जनजागृती करण्यात आली. ग्रामपंचायतींसह गावात प्रत्यक्ष ग्रामस्थांना भेटून त्यांना विविध कायद्यांविषयक माहिती देण्यात आली.
गोदावरी फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हासदादा पाटील आणि डॉ. उल्हास पाटील विधी महाविद्यालयाच्या प्राध्यापिका डॉ. नयना झोपे यांच्या मार्गदर्शनाखाली ही जनजागृती करण्यात आली. याप्रसंगी आसोदा येथे दिलीप कोळी, संजय बिर्हाडे, हेमंत पाटील, शशीकांत पाटील, सागर कोळी, दिलीप चौधरी, बळीराम कोळी तर भादली येथे सरपंच मिलींद चौधरी, उपसरपंच अरूण सपकाळे, दिलीप नारखेडे आणि ग्रामसेवक पी.बी. अहिरे आदींची उपस्थिती होती.