जिल्हास्तरीय वारकरी भवनाचे’ मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार भूमिपूजन – पालकमंत्री पाटील

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | प्रस्तावित जिल्ह वारकरी भवन ५५ एकरांच्या भूखंडावर होणार असून सात कोटी एवढा निधी अपेक्षित असून हे इतर जिल्ह्यांसाठी मार्गदर्शक प्रकल्प ठरणार आहे. वारकरी प्रशिक्षण, विद्यार्थी वसतीगृह, संत निवास, सुटीतील संस्कार शिबिरे इ. माध्यमातून संस्कारी पिढी घढवण्यासाठी उत्तम व्यासपीठ ठरणार आहे. जिल्हास्तरीय “ वारकरी भवन ” बांधकाम जळगाव परिसरात होण्यासाठी जिल्ह्यातील वारकरी मंडळींची व लोकप्रतिनिधींची सातत्याने मागणी होती.त्यानुसार खेडी शिवारात ६ कोटी ०६ लक्ष निधीचे वारकरी भवन मंजूर केले असल्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले. तसेच यासाठी सर्व खासदार व आमदार व जिल्हा प्रशासनाचे सहकार्य लाभल्या बद्दल पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आभार व्यक्त केले.
वारकरी भवनाचे भूमिपुजन मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रस्तावित आहे. त्या नियोजनासाठी शनिवारी दि. २ मार्च २०२४ रोजी जळगाव येथे अजिंठा विश्रामगृहात संपन्न झाली त्या प्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची प्रमुख उपस्थिती होती.

शनिवारी दि.४ मार्च २०२४ रोजी सायं. ६:०० वाजता मुख्यमंत्री ना.एकनाथजी शिंदे यांचे शुभहस्ते वारकरी भवनाच्या वास्तूचे भूमिपूजन होणार या भूमिपूजन कार्यक्रमास हजारोंच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहनही पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी कार्यक्रमाची रूपरेषा मांडून सदर कार्यक्रम पूर्णत: वारकरी पद्धतीने पण शासकीय राजशिष्टाचार सांभाळून पार पाडावा अशी अपेक्षा व्यक्त केली. पालकमंत्र्यांसह जिल्ह्यातील दोन्ही मंत्री व आमदार- खासदार यांच्या सहकार्य व सहमतीने जिल्हा नियोजन समिती निधीमधून मंजूर झालेले हे वारकरी भवन महाराष्ट्रातील पहिलेच उदाहरण ठरणार असून त्यासाठी प्रशासकीय योगदान देण्याची संधी मला लाभली हे माझे भाग्य समजतो आणि वारकरी भवनाच्या भूमिपूजन सोहळ्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केले. या भूमिपूजन सोहळ्याला ग्रामविकास व पर्यटन मंत्री गिरीश महाजन, मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांच्यासह खासदार आमदार व जिल्हा प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहे.

या भूमिपूजन सोहळ्याच्या नियोजन बैठकीस ह.भ.प. परमेश्वरजी महाराज गोंडखेल, ह.भ.प. गोविंद महाराज केकत निंभोरा, ह.भ.प. रविंद्र महाराज हरणे, ह.भ.प. महंत संजीवदास महाराज सावखेडा, ह.भ.प. पांडुरंग महाराज आवारकर, ह.भ.प. सुधाकर महाराज मेहूण, ह.भ.प. समाधान महाराज भोजेकर, ह.भ.प. अंकुश महाराज मनवेल, ह.भ.प. प्रतिभाताई जवखेडेकर, ह.भ.प. गजाननजी महाराज वरसाडे , ह.भ.प. सुशील महाराज विटनेर, ह.भ.प. शाम महाराज पिंपळगाव, ह.भ.प. यशवंत महाराज कमळगाव, ह.भ.प. कन्हैया महाराज, ह.भ.प. विजय महाराजभामरे, ह.भ.प. रुपचंद बाबा दहिवदखुर्द, ह.भ.प. सदाशिव महाराज साकरीकर, ह.भ.प. दिनकर महाराज कडगावकर, यांचेसह संपूर्ण जिल्ह्यातून दिंडीचालक, वारकरी संस्थाचालक, मठाधिपती यांचेसह महिला व पुरुष कीर्तनकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी ह.भ.प.गजानन महाराज वरसाडेकर यांनी मनोगत व्यक्त केले . सदर बैठकीचे संचालन ह.भ.प. प्रा.सी एस पाटील यांनी केले . गजानन महाराज यांनी आभार मानले. कार्यक्रमाची सांगता पसायदानाने करण्यात आली. परमेश्वर म.,आवारकर महाराज व समाधान म.भोजेकर यांची समयोचित भाषणे झाली.

Protected Content