ना. भुजबळ यांच्या उपस्थितीत होणार पोलन पेठचे नामांतरण (व्हिडिओ)

जळगाव, प्रतिनिधी । येथील पोलन पेठ परिसराचे महात्मा ज्योतिबा फुले नगर असे नामकरण उद्या  शुक्रवार २४ सप्टेंबर रोजी अन्न पुरवठा व नागरी संरक्षण मंत्री  ना. छगनराव भुजबळ यांच्या हस्ते करण्यात येणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.

 

याप्रसंगी संस्थापक अध्यक्ष मुरलीधर महाजन, खान्देश माळी महासंघाचे प्रदेशाध्यक्ष संतोष इंगळे, प्रदेश सचिव वसंत पाटील, शिवसेना नेते तथा केशव क्रीडा मंडळ अध्यक्ष किशोर भोसले, जिल्हाध्यक्ष रवींद्र माळी,  अरुण चौधरी आदी उपस्थित होते.

 

पोलन पेठ परिसराचा नामांतरण महात्मा ज्योतिबा फुले नगर करण्यात येणार आहे.  हा नामांतरण सोहळा चित्र चौक येथे दि. २४ सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आला आहे. याप्रसंगी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील, आ. राजूमामा भोळे , आ. चंद्रकांत सोनवणे, महापौर जयश्री सुनील महाजन, जिल्हाधिकारी अभिजित राऊत, पोलीस अधीक्षकडॉ. प्रवीण मुंढे,    माजी महापौर नितीन लढ्ढा, विष्णू भंगाळे, राखीताई शामकांत सोनवणे, नगरसेविका ज्योतीताई शरद तायडे, सरिताताई नेरकर, माजी नगरसेवक किशोर भोसले, शिवसेना सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ आदींची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.   तरी नागरिकांनी या नामांतरण सोहळ्यास उपस्थित रहावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

 

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/819852072039437

 

Protected Content