पाय घसरून तापी नदीत पडल्याने शेतकऱ्याचा बुडून मृत्यू

जळगाव प्रतिनिधी । तापी नदीच्या काठी गुरे चारतांना पाय घसरून पाण्यात बुडून शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना भादली शिवारात घडली. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, जळगाव तालुक्यातील भादली खुर्द येथील शेतकरी सुधाकर बाबुलाल सोवनणे (वय-३८) आपल्या भादली शिवारातील शेतात गेले होते. सोनवणे हे दुपारी ३ वाजेच्या सुमारास स्वत:च्या शेतात गुरे चारत असताना तापी नदीत त्यांचा पाय घसरला आणि ते पाण्यात पडले. दरम्यान त्यांच्या ते बुडाल्याचे पाहून आजूबाजूच्या नागरीकांनी आरडाओरड केली. परंतू त्यांचा मृतदेह आढळून आला नाही. २१ रोजी त्यांचा शोध सुरु असतांना एक किलामीटर अंतरावर भोकर शिवारात तापी नदीत त्यांचा मृतदेह मिळून आला. सुधाकर सोनवणे यांच्या पश्चात एक मुलगा, एक मुलगी, पत्नी, एक भाऊ, दोन बहिणी, आई असा परिवार आहे. दरम्यान, याप्रकरणी जळगाव तालुका पोलिस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून रात्री त्यांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. या घटनेचा पुढील तपास पुढील तपास पो.हे.कॉ. ईश्वर लोखंडे, आर.के. राठोड हे करीत आहेत.

Protected Content