राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल यांच्यावर ईडीची मोठी कारवाई

मुंबई लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी प्लॉट खरदी प्रकरणी मनी लाँडरिंग झाल्याचा आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्यावर ठेवण्यात आला होता. आता ईडीने त्यांच्यावर मोठी कारवाई करत त्यांची संपत्ती जप्त केली आहे. 

याआधी माजी गृहमंत्री अनिल देशमुख, माजी मंत्री नवाब मलिक आणि आता प्रफुल पटेल यांच्यावर ईडीने कारवाई केली असून इक्बाल मिर्ची प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. वरळी येथील प्लॉट खेरदी प्रकरणी मनी लाँडरिंग झाल्याचा आरोप हा प्रफुल्ल पटेल यांच्यावर ठेवण्यात आला होता.

ईडीने केलेल्या या कारवाईत पटेल यांच्या वरळी येथील घर जप्त करण्यात आले आहे. सीजे हाऊस येथील दुसऱ्या मजल्यावर ईडीने आधीच कारवाई केली होती. तर आज चौथ्या मजल्यावर कारवाई केली आहे. दुसऱ्या मजल्यावर ईडीने कार्यालयदेखील सुरू केले आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.