चुंचाळे येथे डॉ पाटील यांचा क्षेत्र भेट मार्गदर्शन उपक्रम दौरा

चोपडा प्रतिनिधी । जळगाव जिल्हा तेल संशोधन केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ आणि उद्योजक प्रलशर प्लांटो. बायोटेक प्रा.ली.जळगाव संचालक निखिल चौधरी यांनी चुंचाळे येथे मोह वृक्ष लागवड पथदर्शक प्रकल्प बागेस भेट देऊन क्षेत्रभेटीच्या उपक्रमात शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.

डॉ एस सी पाटील.प्रमुख शास्त्रज्ञ तेलबिया संशोधन केंद्र जळगाव, (एम.पी.के.व्ही.राहुरी महाराष्ट्र ) यांनी चुंचाळे ता.चोपडा येथील प्रगतशील शेतकरी श्री महाजन यांच्या प्रकल्पास भेट देऊन मोह वृक्षा पासून उत्पादित तेलबिया टोळंबी पासून तयार झालेले तेलाचे बाजारपेठेतील मागणी व विविध उपयोग तेलाच्या विकासा संदर्भात शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. हा मोह वृक्ष कायम स्वरूपी दीर्घकाळ आर्थीक उत्पन्नासाठी शेतकऱ्यांना एक वरदान ठरणार असून इतरही फळबागा प्रमाणे संगोपन केल्यास नैसर्गिक तेलाचे मोठ्या प्रमाणामध्ये उत्पादन होऊ शकते. अशा पथदर्शक प्रकल्पातून तेलाच्या होणाऱ्या विविध उपयुक्ततेसाठी मागणी मुळे शेतकऱ्यांना कायमस्वरूपी उत्पन्न मिळू शकेल. या वृक्षापासून फक्त तेलच मिळत नाही. टोळंबी पासून तेल काढून मिळणारी फळांच्या वरच्या व मधल्या आवरणाची पेंड सुद्धा सेंद्रिय शेतीसाठी उत्तम खत म्हणून उपयोगी आहे.

बियांचे टरफलापासून औद्योगिक क्षेत्रात काजू बियांच्या टरफले प्रमाणे उपयोग होऊ शकतो टोळी फळचा लगदा व झाडाचे पासून मिळणाऱ्या चिक (पातळ दुधा सारखा द्रव ) यांचे उपयोग औद्योगिक क्षेत्रात रंग व साबण उद्योगात चांगल्या प्रकारे होऊ शकतो असे मत डॉ.पाटील तेलबिया संशोधन केंद्र शास्त्रज्ञ व उद्योजक चौधरी यांनी व्यक्त केले.याप्रसंगी परिसरातील शेतकरी उपस्थित होते तेलबिया संशोधन केंद्रा मार्फत दुर्लक्षित मोहवृक्षाच्या तेल या उपघटका संदर्भात मार्गदर्शन केले जाईल. यासाठी मोह वृक्षाची कलमीकरण केलेल्या सरस झाडांची निवड गरजेचे असल्याचे मत शास्त्रज्ञ व उद्योजक यांनी सूचित केले या प्रसंगी मोह वृक्ष संदर्भात केलेल्या संशोधित कार्याबद्दल नाविन्यपूर्ण प्रयोगशील  शेतकरी म्हणून श्री महाजन यांचे डॉ.पाटील व उद्योजक चौधरी यांनी अभिनंदन केले.

 

Protected Content