आॕर्किड स्कूलमध्ये राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी

चोपडा प्रतिनिधी । येथील यशोधन चॕरिटेबल ट्रस्ट संचलीत आॕर्किड इंटरनॕशनल स्कूलमध्ये स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांची जयंती आॕनलाईन पध्दतीने साजरी करण्यात आली. 

संस्थेचे अध्यक्ष डॉ. राहुल पाटिल यांनी स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांचे प्रतिमा पुजन केले. कार्यक्रमास ज्यु.के.जी, सिनि.के.जी. व इ.१ ली ते ४ थीचे विद्यार्थी सहभागी झाले होते. इ.३री व ४ थीच्या विद्यार्थ्यांनी स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांचे विचार कथन केले. शाळेचे मुख्याध्यापक यांनी स्वामी विवेकानंद यांचे विचार व जीवनातील प्रसंग तसेच राजमाता जिजाऊ एक आर्दश गुरु व आई होत्या. यावरील प्रसंग कथन केले. अध्यक्षिय भाषणातुन डाॕ राहुल पाटिल यांनी विद्यार्थ्यांना स्वामी विवेकानंद  व राजमाता जिजाऊ यांच्या आदर्श  गुणांची कास धरुन, जीवनात आचरणात आणून आदर्श  व्यक्तिमत्त्व  होण्याच्या शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.नितेश वाघ  यांनी केले. संपूर्ण कार्यक्रम यशस्वीपणे पार  पाडण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक, समन्वयक,शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

 

Protected Content