महसूल खात्याचे पुरस्कार जाहीर; डॉ. अजित थोरबोलेंचा होणार सत्कार

शेअर करा !

फैजपूर, ता. यावल प्रतिनिधी । महसूल दिनाच्या पार्श्‍वभूमिवर जिल्ह्यातील सर्वोत्कृष्ट कामगिरी बजावणार्‍या अधिकारी व कर्मचार्‍यांची नावे जाहीर करण्यात आली असून यात फैजपूरचे प्रांताधिकारी डॉ. अजित थोरबोले यांचा समावेश आहे.

याबाबत वृत्त असे की, ३ ऑगस्ट २०२० रोजी नाशिक विभागीय स्तरावर व्हिडीओ कॉन्फरन्सींगच्या माध्यमातून महसूल दिन साजार करण्यात येणार आहे. या पार्श्‍वभूमिवर, आज निवासी उपजिल्हाधिकारी राहूल पाटील यांनी सर्वोत्तम कामगिरी बजावणारे अधिकारी व कर्मचार्‍यांना महसूल दिनी सत्कार करण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे. या यादीत सर्वोत्कृष्ट कामगिरी बजावणारे उपजिल्हाधिकारी म्हणून निवडणूक शाखेचे उपजिल्हाधिकारी तुकाराम हुलवडे व फैजपूरचे प्रांताधिकारी डॉ. अजित थोरबोले यांचा समावेश आहे.

डॉ. अजित थोरबोले यांनी महसूल खात्याची धुरा तर अतिशय समर्थपणे सांभाळलीच आहे. पण याच्या जोडीला कोविड-१९च्या आपत्तीमध्ये त्यांनी थेट मैदानावर उतरून केलेली कामगिरी व जनजागृती ही अतिशय उपयुक्त ठरली असून यामुळे त्यांना जनतेचे खूप प्रेम मिळाले आहे. यातच आता त्यांच्या कामगिरीवर जिल्हा प्रशासनाने कौतुकाची थाप उमटवली आहे. यामुळे डॉ. अजित थोरबोले यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

आम्हाला फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!