गणितात प्रथम आलेल्या काजल बिचवेचा सत्कार

शेअर करा !

धरणगाव प्रतिनिधी । येथील शतकमहोत्सवी पी. आर.हायस्कूलची विद्यार्थिनी कु. काजल संतोष बिचवे हिने पैकीच्या पैकी गुण मिळवून गणित विषयात राज्यात प्रथम येण्याचा बहुमान मिळवला असून याप्रित्यर्थ तिचा सत्कार करण्यात आला.

काजल संतोष बिचवे या खत्री गल्लीतील विद्यार्थिनीने दहावीच्या परीक्षेत गणित या विषयात गुण मिळवून गणित या विषयात महाराष्ट्रात प्रथम येण्याचा बहुमान पटकावला आहे. काजलने ९५.६० टक्के गुण मिळवून शाळेत द्वितीय स्थानी येण्याचाही मान मिळवला आहे. तिला गणित विषयाचे तज्ज्ञ शिक्षक सुरेंद्र प्रकाश सोनार यांचे मार्गदर्शन लाभले. काजल ही योगी कॉर्नर या प्रतिष्ठानचे मालक संतोष सनातन बिचवे यांची कन्या असून ते सुद्धा पी. आर. हायस्कूलचेच माजी विद्यार्थी आहेत.काजलच्या यशाबद्दल तिचे पी.आर.हायस्कूल सोसायटीचे अध्यक्ष डॉ. अरुण कुलकर्णी, उपाध्यक्ष वसंतराव गालापुरे, मानद सचिव डॉ. मिलिंद डहाळे व सर्व संचालक मंडळ तथा मुख्याध्यापक एस. एम. अमृतकर, उपमुख्याध्यापक डॉ. संजीवकुमार सोनवणे, पर्यवेक्षक आर. के. सपकाळे यांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला.

आम्हाला फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!