चोरवड नाक्याजवळ सीमेवर गुटख्याने भरलेला ट्रक पकडला

रावेर शालीक महाजन । मध्यप्रदेशच्या सीमेवरील चोरवड नाक्याजवळ गुटख्याने भरलेला ट्रक पकडण्यात आला आहे. यात लाखोंंचा माल असल्याची माहिती असून पोलिसांनी याबाबत गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

महाराष्ट्र-मध्य प्रदेश चोरवड सिमेवर रात्री उशीरा रावेर पोलिसांनी गुटख्याने भरलेला ट्रक पकडला आहे. लॉकडाऊन असतांना हा ट्रक इंदूर येथून जळगावात येणार होता. पोलिसांकडून मिळालेल्या माहिती नुसार मध्यप्रदेशातील इंदूर येथून गुटखा भरलेला एमपी ०९ जीजी ७६४२ या क्रमांकाचा ट्रक हा लोणी चेकपोस्ट पास करून महाराष्ट्रात चोरवड नाक्यावर आला होता. येथे गस्तीवर असलेले पोलिस उपनिरिक्षक सुनिल कदम आपले सहकारी पोलिस कॉस्टेबल महेंद्र पाटील यांच्या सोबत वाहने चेक करत असतांना त्यांना याबाबत संशय आला. त्यांनी ट्रक चेक केला असता त्यात गुटखा भरल्याचे आढळून आले.

यात लाखो रूपयांचा गुटखा असल्याची माहिती समोर आली आहे. त्यात अजुन कोणत्या कंपनीचा गुटखा भरला आहे समजू शकले नाही परंतु रावेर पोलिसांनी ट्रक जप्त करून रावेर पोलिस स्टेशनला आणला आहे. उपविभागीय अधिकारी नरेंद्र पिंगळे पोलिस निरिक्षक रामदास वाकडे यांच्या मार्गदर्शना खाली साहाय्यक पोलिस निरीक्षक शितलकुमार नाईंक ट्रक मध्ये असलेल्या गटख्याची माहिती घेत आहेत. रावेर पोलिसांची धडाकेबाज कारवाईमुळे गुटखा माफियामध्ये खळबळ माजली आहे.

Protected Content