अफवा पसरवू नका; अन्यथा होणार कायद्याशीर कारवाई : डॉ कुणाल सोनवणे

यावल – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । येथील पोलीस ठाण्याच्या आवारात शांतता समितीची बैठक संपन्न झाली. दोन समाजामध्ये अफवा पसरवून गैरसमज निर्माण करण्याचा जर कुणी प्रयत्न केला तर अशा व्यक्तीवर कायदेशीर कारवाई होईल असा इशारा डॉ. सोनवणे यांनी पोलीस प्रशासनाच्या वतीने दिला.

आज बुधवार, दिनांक ४ मे २०२२ रोजी यावल येथे शांतता समितीची बैठक संपन्न झाली. यात सोशल मीडियाच्या माध्यमातून अफवा पसरवून दोन समाजात तेढ निर्माण करीत शांतता बिघडवण्याचा व समाज एकोप्याला जर कुणी गालबोट लावण्याचा प्रयत्न केला तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशारा पोलीस प्रशासनाच्या वतीने दिला.

या बैठकीला शांतता समितीचे जेष्ठ सदस्य हाजी शब्बीर खान मोहम्मद खान, प्रमोद यशवंत नेमाडे,  माजी नगरसेवक दिपक बेहडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष प्रा.मुकेश येवले, शिवसेनेचे शहरप्रमुख जगदीश कवडीवाले, हाजी गफ्फार शाह, गोपाळसिंग पाटील, भाजपाचे तालुका अध्यक्ष उमेश रेवा फेगडे, शिवसेनेचे तालुका उपप्रमुख शरद कोळी, माजी नगरसेवक गुलाम रसुल, भाजपा शहराध्यक्ष निलेश गडे, तालुका खरेदी विक्री संघाचे चेअरमन अमोल भिरूड, शिवसेनेचे पप्पू जोशी, राष्ट्रवादीचे सईद शेख रशीद, हबीब शेख मंजर यांच्यासह नागरिका बैठकीस उपस्थित होते.

सद्या काही विघ्नसंतोषी मंडळीकडून अफवा फसवून शांतता बिघडवण्याचा प्रयत्न करण्यात होत असून सर्व जातीधर्माच्या नागरीकांनी असा कुठल्याही अफवांना बळी न आपल्या शहराची व परिसराची शांतता राखण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे. असे आवाहन यावेळी विभागीय पोलीस अधिकारी डॉ कुणाल सोनवणे व सहाय्यक पोलीस अधिक्षक अतिश कांबळे यांनी उपस्थित नागरीकांना केले .

 

Protected Content