महापालिका आयुक्तपदी डॉ. विद्या गायकवाड

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | जळगाव शहर महापालिकेच्या आयुक्तपदी डॉ. विद्या गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली असून याबाबतचे शासनाचे निर्देश प्रशासनाला प्राप्त झाले आहे.

जळगाव महापालिकेचे आयुक्त सतीश कुलकर्णी हे ३० एप्रिल रोजी सेवानिवृत्त झाले. यामुळे आयुक्तपदाची सूत्रे कुणाच्या हाती येणार याबाबत चर्चा सुरू झाली होती. दरम्यान, ३० रोजीच सायंकाळी आयुक्तपदाचा तात्पुरता कार्यभार हा अतिरिक्त आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांच्याकडे आला होता. आता त्यांच्याकडेच आयुक्तपदाची जबाबदारी आली असून नगरविकास खात्याने त्यांना महापालिकेच्या आयुक्त म्हणून नियुक्ती प्रदान केली आहे. अर्थात, त्या जळगाव महापालिकेच्या पहिल्या महिला आयुक्त ठरल्या आहेत.

डॉ. विद्या गायकवाड या जळगाव महापालिकेत अतिरिक्त आयुक्त म्हणून वर्षभरापासून काम पाहत आहेत. आता त्यांच्याकडेच महापालिकेची धुरा आली असून शहर विकासाला गती देण्याचे काम त्यांच्याकडून होईल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!
%d bloggers like this: