गावठी हातभट्टीवर पोलीसांची धाड; तीन जणांवर गुन्हा दाखल

यावल – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  यावल तालुक्यातील पिंप्री शिवारातील तापी नदी पात्राच्या काठावरील तीन गावठी हातभट्टीवर पोलिसांनी छापा टाकून सुमारे ४२ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला आहे. याबाबत यावल पोलीस ठाण्यात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत माहिती अशी की, यावल तालुक्यातील पिंप्री शिवारात असलेल्या तापी नदीच्या पात्राच्या काठावर बेकायदेशीर रिता गावठी दारूची हातभट्टी सुरू असल्याची गोपनीय माहिती  फैजपूर उपविभागीय पोलीस अधिकारी कुणाल सोनवणे यांना शनिवारी ९ एप्रिल रोजी सकाळी मिळाली. त्यानुसार फैजपूर उपविभागीय पोलीस कार्यालय आणि यावल पोलीस ठाणे यांच्या संयुक्तपण  शनिवारी ९ एप्रिल रोजी तीन ठिकाणी वेगवेगळे छापा टाकून एकुण ४२ हजार रूपये किंमतीचा कच्चे व पक्के रसायन, तयार केलेली गावठी दारून नष्ट करण्यात आली आहे. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात संशयित आरोपी आकाश निवृत्ती कोळी, पांडुरंग प्रकाश सपकाळे आणि दिलीप पुना कोळी तिघे रा. पिंप्री ता. यावल यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास यावल पोलीस ठाण्याचे कर्मचारी करीत आहे.

 

यांनी केली कारवाई

उपविभागीय पोलीस अधिकारी कुणाल सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार अविनाश चौधरी, पोहेकॉ दिलीप तायडे, सुमित बाविस्कर, रशिद तडवी, अशोक जावळे, किशोर परदेशी, पोलीस नाईक संदीप सूर्यवंशी यांनी केली आहे.

Protected Content