यावल – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | तालुक्यात ग्रामीण भागात मध्यप्रदेश राज्यामधून पॅरा मेडीलकल ही पदवी घेऊन जळगाव जिल्ह्यात परप्रांतीय डॉक्टर यांनी राजरोसपणे आपला अवैध वैद्यकीय व्यवसाय सुरू केला असून या बेकायद्याशीर सुरू असलेल्या या आळा बसावा. या मागणीसाठीचे निवेदन जिल्हाधिकारी अभिजित राऊत व जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याकडे देण्यात आले आहे.
या संदर्भात यावल तालुका वैद्यकीय असोसिएशनच्या वतीने करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, “यावल तालुक्यातील कोरपावली गावात गेल्या अनेक दिवसा पासुन बोगस बंगाली डॉक्टर यांने आपला उपचाराचा व्यवसाय गावातील चौकात एका घरात सुरू केला आहे. या बोगस बंगाली डॉक्टरकडे कोणतीही वैद्यकीय पदवी नसतांना त्यांने उपचाराच्या नांवाखाली बेकाद्याशीर आपले उपचाराचे दुकान सुरू केले आहे. अशा प्रकारे उपचाराच्या नांवाखाली नागरीकांच्या जिवाशी खेळणाऱ्या या बोगस डॉक्टरवर योग्य ती कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
याबाबत सौखेडा सिम तालुका यावलच्या प्राथमिक उपकेंद्राचे वैद्यकिय अधिकारी यांच्या पथकाने आपल्या क्षेत्रातील विशेष करून ग्रामीण भागातील बोगस डॉक्टरांचे प्रमाणपत्र पडताळणी करण्यासाठी जळगाव जिल्हा वैद्यकीय अधिकारी यांच्याकडे पाठविली असून जोपर्यंत अहवाल प्राप्त होत नाही तो पर्यंत या बोगस डॉक्टरांनी उपचार व्यवसाय बंद करावे. अशी नोटीस त्यांना बजावण्यात आली आहे.
या संदर्भातील अद्याप अहवाल प्राप्त झाला नसून तरी देखील कोरपावलीसह इतर तालुक्यातील काही गावात बंगाली व आदी आपला डॉक्टरीचा वैद्यकिय व्यवसाय कुणाला न जुमानता सुरु ठेवला असून अशा पद्धीतीच्या उपचाराच्या नांवाखाली ग्रामीण भागातील गरीब आदिवासी जनतेच्या जीवाशी खेळ खेळला जात आहे. या विषयावर तालुक्यातील वरिष्ठ अधिकारी यांनी गांभीर्याने लक्ष द्यावे. अशी मागणी लेखी तक्रार करण्यात आली असतांना देखील अधिकारी वर्गाचे या नागरीकांच्या आरोग्याशी निगडीत प्रश्ना दुर्लक्ष करीत असल्याचा आक्षेप व आरोप यावल तालुका डॉक्टर असोशिएशनच्या वतीने करण्यात येत आहे.
तालुक्यातील बोगस डॉक्टर व्यवसायिकांची चौकशी करून तात्काळ त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी. अशी मागणी यावल तालुका डॉक्टर असोसिएशचे शिष्ट मंडळाच्या वतीने जिल्हाधिकारी डॉ अभिजीत राऊत यांच्याकडे दिलेल्या निवेदनात म्हटले असून या संदर्भात कार्यवाही न झाल्यास तालुका वैद्यकीय असोसिएशन वतीने साखळी उपोषण करणार असल्याचा इशारा निवेदनाव्दारे देण्यात आला आहे.
निवेदनावर डॉ.रमेश पाचपोळे, डॉ.सतीश यावलंकर, डॉ..इसरार खान, डॉ.तूषार फेगडे, डॉ.धिरज चौधरी, डॉ.सतीश असवार, डॉ.मनोज वारके, डॉ.अमीत तडवी, डॉ.बारी डॉ.गोपाल सावकारे, डॉ. सरफराज तडवी, डॉ.श्रीकांत महाजन, डॉ.मोहसीन खान यांच्या स्वाक्षरी आहेत.