कोटेचा महिला महाविद्यालयात हिंदी सप्ताह समारोह संपन्न

भुसावळ – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | येथील कोटेचा महिला महाविद्यालय भुसावळ, हिंदी विभागामार्फत हिंदी सप्ताहाचे आयोजन करण्यात आलेले होते. त्यामध्ये कथावाचन, काव्यवाचन, पोस्टर, निबंध लेखन व हिंदी सामान्य ज्ञान स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाचे उद्घाटन कनिष्ठ महाविद्यालयाच्या पर्यवेक्षिका डॉ. सरोज शुक्ला यांच्या हस्ते करण्यात आले. उपप्राचार्य डॉ. व्ही. एस पाटील यांच्या हस्ते भिंती पत्रिकेचे विमोचन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. गिरीश कोळी यांनी केले.

यामध्ये त्यांनी वर्षाभरामध्ये महाविद्यालयामध्ये हिंदी विभागामार्फत चालवले जाणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली. मागील वर्षांमध्ये महाविद्यालयात राष्ट्रीय सेमिनारचे आयोजन नागरी परिषद नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आलेले होते. यावर्षी सुद्धा नागरी लिपी  नवी दिल्ली याच्या संयुक्त विद्यमाने  कार्यशाळेचे आयोजन करण्यात येईल.  या कार्यक्रमाध्ये सर्व विद्यार्थिनींनी स्वयंस्फूर्तीने सहभागी व्हावे असे विद्यार्थिनींना आवाहन केले.

अध्यक्षीय मनोगतामध्ये उपप्राचार्य डॉ. व्ही. एस. पाटील यांनी भाषेबद्दल विद्यार्थिनींना जागृत केले. “भाषा कोणतीही असो ती बोलता आली पाहिजे, सतत  बोलण्याचा प्रयत्न केला पाहिजे. बोलता बोलता चुका होणे स्वाभाविक आहे जर चुका झाल्यात तर आपणास ती भाषा नक्कीच शिकता येते.  जर आपण बोलण्याचा प्रयत्न केलाच नाही तर आपल्याला कोणतीच भाषा शिकणे शक्य होणार नाही. त्यामुळे भाषा कोणतेही असो ती शिकण्याचा सतत प्रयत्न करायलाच हवा. असे आवाहन केले.”

स्पर्धेचा निकाल –

काव्यलेखन स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक छाया नेवसकर, द्वितीय क्रमांक ज्योती सावकारे, तर तृतीय क्रमांक कल्याणी पाटील तसेच हिंदी सामान्य ज्ञान प्रतियोगिता या स्पर्धेत प्रथम क्रमांक ज्योती सावकारे व कल्याणी पाटील द्वितीय क्रमांक वर्षा माळी आणि तृतीय क्रमांक धनश्री विजय या विद्यार्थिनींनी प्राप्त केले. त्याचप्रमाणे भिंती पत्रिका प्रदर्शनमध्ये उत्कृष्ट भिंती पत्रक बिपाशा कनोजिया या विद्यार्थीनीला प्राप्त झाले.

विद्यार्थिनी मनोगतामध्ये निशा पाटील हिने हिंदी कवितेचे गायन करून हिंदीचे महत्त्व स्पष्ट केले; तर आशिया शेख या विद्यार्थिनींने हिंदी राष्ट्रभाषा तीचे महत्व आणि विश्व भाषा याबद्दल आपले विचार व्यक्त केले.

या कार्यक्रमांमध्ये प्रा. जाकीर शेख यांनी हिंदी विभागामध्ये सुरू असलेल्या विविध स्पर्धांची माहिती दिली. यामध्ये महाविद्यालयातील विद्यार्थिनींचा सक्रिय सहभाग होता. या सर्व कार्यक्रमांना  महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. मंगला साब्रदा, प्रा. वाय. डी. देसले यांचे अनमोल सहकार्य लाभले.

हिंदी विभागामार्फत हिंदी विकास मंचाचे उद्घाटन करण्यात आले. या विकास मंचाचे महाविद्यालयातील विद्यार्थिनी अध्यक्ष कु. भुमिका पाटील, सदस्य यशश्री नेमाडे, तेजल मोरे, धनश्री भोई, धनश्री तायडे, सृष्टी चौधरी, दिक्षा गजरे, यामिनी चौधरी या विदयार्थींनीची निवड करण्यात आली. या कार्यक्रमासाठी डॉ. गिरीश कोळी प्रा. जाकिर शेख, प्रा. नीलम कोळी, प्रा. मुक्ती जैन, प्रा. निलेश गुरूचल, प्रा. विनोद भालेराव, प्रा. गिरीश सरोदे, प्रा. मनीषा इंगळे यांनी परिश्रम घेतले.

Protected Content