कलागुणांचा वापर रोजगारासाठी करा – प्रा. डॉ. सुधा खराटे

भुसावळ  – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | येथील श्रीमती प.क. कोटेचा महिला महाविद्यालयात वाड्.मय,कला आणि अभ्यास मंडळाचे उद्घाटन यावल महाविद्यालयाच्या मराठी विभाग प्रमुख डॉ. सुधा खराटे यांच्या हस्ते नटराज व सरस्वती पूजनाने करण्यात आले.    

सुरुवातीला मराठी विभागातील विद्यार्थिनींनी तयार केलेल्या मराठी वाड्.मय मंडळाच्या भिंतीपत्रिकेचे उद्घाटन प्रा.डॉ.सुधा खराटे, उपप्राचार्य व्ही.एस.पाटील, उपप्राचार्य वाय.डी.देसले यांच्या हस्ते करण्यात आले.

याप्रसंगी डॉ. खराटे यांनी विद्यार्थिनींनी आपल्या मधील सुप्त कलागुणांचा विकास करण्याचे आवाहन केले; तसेच विद्यार्थिनींना अवांतर वाचन, लेखन आणि चिंतन करून आपल्या मधील कलागुणांचा विकास करा. असा सल्ला त्यांनी विद्यार्थिनींना दिला. तसेच ब्युटी पार्लर, रांगोळी, मेहंदी, शिवणकला, पाककला, चित्रकला इत्यादी कलांचा वापर रोजगार मिळवण्यासाठी करण्याचे आव्हान केले. तसेच ‘हव्यास’ या कथेचे कथाकथन करून नोकरी करणाऱ्या कुटुंबाची व्यथा सांगितली.

सुरुवातीला कल्याणी पाटील या विद्यार्थिनीने कवियत्री बहिणाबाई चौधरी यांच्या कविताचे वाचन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष उपप्राचार्य डॉ. विलास पाटील यांनी विद्यार्थिनींना महाविद्यालयात विविध समितीमार्फत आयोजित कार्यक्रमात आणि व्याख्यानात सक्रिय सहभाग घेऊन आपल्या व्यक्तिमत्त्वाचा विकास करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक समिती प्रमुख डॉ.शरद अग्रवाल यांनी केले तर पाहुण्यांचा परिचय प्रा. विनोद भालेराव यांनी करून दिला. सूत्रसंचालन प्राध्यापिका मनीषा इंगळे तर आभार प्रदर्शन कुमारी तेजल मोरे या विद्यार्थिनींनी केले.

कार्यक्रमाची सर्व व्यवस्था एफ. वाय. बी. ए. च्या विद्यार्थिनी धनश्री भोई ,तेजल मोरे, धनश्री तायडे, प्राजक्ता वाहुळकर यांनी पार पाडली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राचार्य डॉ. मंगला साबद्रा ,उपप्राचार्य वाय.डी.देसले यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाला मराठी, हिंदी, इंग्रजी विभागातील प्राध्यापक आणि विद्यार्थिनींची उपस्थिती होती.

Protected Content