जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | जिल्हा प्रधान सत्र न्यायधीश मोहम्मद काशिम शेख मुसा शेख व जिल्हा लीगल सर्व्हिस ऑथॉरिटीचे सचिव सलीम पिरमोहम्मद सैय्यद यांनी जळगाव जिल्हा कारागृहास भेट देवून मॅाडर्नायझेशन अंतर्गत किॲाक्समशिन, २०५ कॅमेरेसह सिसीटिव्ही नियंत्रण कक्ष, ०५ नग ॲलन स्मार्ट कार्ड टेलीफोन सुविधा, ०६ नग कोर्टपेशीसाठी व्हिसी कक्ष, ०३ नग बंदी नातेवाईक-वकिलभेटीसाठी ॲानलाईन लिंकद्वारे व्हिसीवर ईमुलाखत सुविधा, प्रत्यक्ष भेटीची मुलाखत रूम, लायब्ररी व ईलायब्ररी, २० नग ५० टिव्हीसंच, ०५ नग वॅाटरकुलर, बंदी विनंती, कोर्टपेशीसाठी पोलीस पथक, स्वच्छता, दवाखाना औषधोपचार, हॅाटपॅाटसह स्वयंपाकगृहातील जेवन ई पाहणी करून निरीक्षण केले.
जिल्हा प्रधान सत्र न्यायाधीश यांच्याहस्ते १० बंद्याना वैद्यकिय सुविधेसाठी आयुषमान भारत कार्डचे वाटप करणेत आले. व जिल्हाधिकारी, आयुष प्रसाद यांचे मार्गदर्शनानुसार डिपीडीसीअंतर्गत नविन महिला विभागातील २ बॅरेक, पुरूष विभागातील २ बॅरेक, तृतियपंथीसाठी २ बॅरेक, कपडागोदाम, व्हिसी रूम, अंतर्गत सिमेंट रस्ता, जनरेटर शेड, मेनगेटसमोरील पेव्हर ब्लाकचे सुशोभीकरण, पाकगृह शेड, कार्यालयाची रंगरंगोटी, तटभिंत ५ तार फेंसींगसह वाढीव बांधकामाची पाहणी केली व सदर पाहणी व निरीक्षणावेळी अधिक्षक जळगाव जेल, वांढेकर, तुरूंग अधिकारी व इतर सर्व कर्मचारी उपस्थित होते .