Home आरोग्य दिलासादायक : जिल्ह्यात आज १०९ संक्रमित रूग्ण आढळले; चार तालुके निंरक

दिलासादायक : जिल्ह्यात आज १०९ संक्रमित रूग्ण आढळले; चार तालुके निंरक

0
105

जळगाव प्रतिनिधी । जिल्हा कोवीड रूग्णालयाने पाठविलेल्या कोरोना अहवालात आज दिवसभरात १०९ रूग्ण कोरोना संक्रमित आढळूल आले आहे. त्यापैकी ३२८ रूग्ण बरे होवून घरी परतले. तर आज चार तालुके निरंक असल्याचे दिसून येत आहे.

जिल्हाभरातील आजची आकडेवारी

जळगाव शहर-१२, जळगाव ग्रामीण-०, भुसावळ-५, अमळनेर-१, चोपडा-१, पाचोरा-६, भडगाव-१, धरणगाव-०, यावल-०, एरंडोल-४९, जामनेर-१, रावेर-६, पारोळा -४, चाळीसगाव-२०, मुक्ताईनगर-०, बोदवड-१ आणि इतर जिल्ह्यातील २ असे एकुण १०९ बाधित रूग्ण आढळले आहे.

जिल्ह्यात आजपर्यंत १ लाख ४१ हजार १०३ बाधित रूग्ण आढळले आहे. त्यापैकी १ लाख ३५ हजार ९२९ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. तर २ हजार ६१७ रूग्ण विविध कोवीड रूग्णालयात उपचार घेत आहे. आज दिवसभरात २ बाधित रूग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस.चव्हाण यांनी कळविले आहे. 

 


Protected Content

Play sound