लोणजे येथील विलगीकरण कक्षास पदाधिकाऱ्यांनी दिली सदिच्छा भेट

चाळीसगाव प्रतिनिधी । कोरोनाच्या पाश्वभूमीवर तालुक्यातील लोणजे येथे कै. मदनसिंग उदयसिंग राठोड यांच्या स्मरणार्थ मधुभाऊ रूग्णाश्रम विलगीकरण कक्षाची स्थापना करण्यात आली असून पदाधिकाऱ्यांनी मंगळवार रोजी सदिच्छा भेट देऊन रूग्णाश्रामाची पाहणी केली. 

तालुक्यातील लोणजे येथे कै. मदनसिंग उदयसिंग राठोड यांच्या स्मरणार्थ मधुभाऊ रूग्णाश्रम विलिनीकरण कक्षाची स्थापना शनिवार रोजी करण्यात आली आहे. डॉ. गोरख राठोड व डॉ. संदीप राठोड यांच्या अथक परिश्रमातून हे कक्ष स्थापन करण्यात आले आहे. या कक्षेत एकूण १० खाटांची व्यवस्था जरी  करण्यात आलेली असली. तरी ती वाढवून २० करण्यात येणार आहे. तालुक्यातून ग्रामीण विभागातील हे पहिले विलगीकरण कक्ष रूग्णांच्या सेवेत रूजू झाल्याने सर्व स्तरातून याबाबत प्रशंसा होत आहे. गावातील भुमिपुत्रांनी एकत्र येऊन कक्षाची स्थापना केली असून या कक्षात दोन वेळेचे सकस जेवण मोफत देण्यात येणार आहे.

इतर ठिकाणीही अशा प्रकारचा रूग्णाश्रम स्थापन करण्यात यावा यासाठी मंगळवार रोजी प्रांताधिकारी लक्ष्मीकांत साताळकर, तहसीलदार अमोल मोरे, गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर, सहायक गटविकास अधिकारी अजितसिंग पवार, विस्तार अधिकारी माळी, विस्तार अधिकारी आर. आर. पाटील, ग्रामविकास अधिकारी शिरके आदींनी रूग्णाश्रमास सदिच्छा भेट देऊन पाहणी केली. दरम्यान यावेळी डॉ. गोरख राठोड व डॉ. संदीप राठोड, ग्रामसेवक, तलाठी व इतर कर्मचारी उपस्थित होते.

 

Protected Content