जळगाव (प्रतिनिधी) जिल्हा माहिती कार्यालयाच्या अधिनस्त असलेले उप माहिती कार्यालय, चाळीसगाव येथील दुरमुद्रण चालक श्री. राजेश सोनार आणि संदेश वाहक श्री. अशोक माधव मोराणकर हे प्रदिर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त झाले. त्यानिमित्ताने त्यांना जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने स्नेहपुर्ण निरोप देण्यात आला.
याप्रसंगी जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके यांनी श्री. सोनार व मोराणकर यांचा शाल, श्रीफळ, भेटवस्तु व पुष्पगुच्छ देऊन त्यांच्या भावी आयुष्यासाठी सदिच्छा दिल्यात. यावेळी जिल्हा माहिती कार्यालयातील कर्मचारी विनोद पाटील, प्रविण बावा, रामकृष्ण कोळी, शांताराम नरोटे, प्रमोद भंगाळे, पंकज ठाकूर आदि उपस्थित होते. राजेश सोनार यांनी आपल्या 28 वर्षाच्या शासकीय सेवेत धुळे, मालेगाव, नाशिक, जळगाव व चाळीसगाव येथे सेवा बजावली असून त्यांनी 30 मे, 2019 रोजी प्रदिर्घ सेवेनंतर स्वेच्छा सेवानिवृत्ती स्वीकारली तर अशोक मोराणकर यांनी आपल्या 34 वर्षाच्या शासकीय सेवेत ग्रामीण ध्वनीक्षेपण कार्यालय, जळगाव, जिल्हा माहिती कार्यालय, जळगाव, विभागीय माहिती कार्यालय, नाशिक याठिकाणी सेवा बजावून ते 31 मे, 2019 रोजी नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले.