थॉमसनं फिन्चला सहा धावांवर बाद : ऑस्ट्रेलियाला धक्का

6 baad

 

मुंबई प्रतिनिधी । यंदा आयसीसीचा होणारा हा बारावा वर्ल्डकप आहे. यापूर्वी १९७५, १९७९, १९८३ आणि १९९९ साली इंग्लंडमध्ये वर्ल्ड कप खेळवण्यात आला होता. अत्यंत अनाकलनीय आणि बेभरवशी संघ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वेस्ट इंडीजनं तगड्या ऑस्ट्रेलियाची दाणादाण उडवली आहे. डेव्हीड वॉर्नर, अरॉन फिन्च, उस्मान ख्वाजा आणि ग्लेन मॅक्सवेल या रथी-महारथींना एकापाठोपाठ एक तंबूचा रस्ता दाखवत विंडीजच्या गोलंदाजांनी धमाका केला आहे.

यंदाच्या वर्ल्ड कप स्पर्धेतील १०व्या सामन्यात बलाढ्य ऑस्ट्रेलिया आणि खतरनाक वेस्ट इंडीज आमने-सामने उभे आहेत. ट्रेन्ट ब्रीज मैदानावर होत असलेल्या या सामन्यात विंडीजनं नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाला प्रथम फलंदाजी दिली आहे. कर्णधाराचा हा निर्णय शेल्डन कॉट्रेल, ऑशने थॉमस आणि आंद्रे रसेल या त्रिकुटानं योग्य ठरवला. थॉमसनं फिन्चला सहा धावांवर बाद करून ऑस्ट्रेलियाला पहिला धक्का दिला. त्यानंतर पुढच्याच ओव्हरमध्ये कॉट्रेलनं डेव्हीड वॉर्नरचा अडथळा दूर केला. उस्मान ख्वाजा थोडा स्थिरस्थावर होत असतानाच, आंद्रे रसेलनं त्याला चकवलं आणि मॅक्सवेलला तर कॉट्रेलनं भोपळाही फोडू दिला नाही. त्यामुळे ७.४ षटकांत ऑस्ट्रेलियाची अवस्था ४ बाद ३८ अशी झाली.

Add Comment

Protected Content