शहरात रंगणार जळगाव क्रिकेट लीगचा थरार ! ( व्हिडीओ )

जळगाव प्रतिनिधी । शहरात पहिल्यांदाच आयपीएलच्या धर्तीवर जळगाव क्रिकेट लीग स्पर्धेचे आयोजन करण्यात येत असून याबाबतची माहिती आज पत्रकार परिषदेत देण्यात आली.

जिल्हा क्रिकेट असोसिएशनतर्फे आज शहरातील हॉटेल प्रेसिडेंट कॉटेजमध्ये पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले. यात संघटनेचे अध्यक्ष अतुलभाऊ जैन यांनी जळगाव क्रिकेट लीगबाबत माहिती दिली. याप्रसंगी माजी आमदार सुरेशदादा जैन, जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोकभाऊ जैन, रतनलाल बाफना, रजनीकांत कोठारी, युसुफ मकरा आदी मान्यवर उपस्थित होते. सध्या सर्वत्र आयपीएलचा टी-२० हा प्रकारा प्रचंड प्रमाणात लोकप्रिय झाला आहे. या अनुषंगाने जळगाव प्रिमीयर लीगचे आयोजन करण्यात येणार आहे. या स्पर्धेत शहरातील आठ संघ सहभागी होणार असून यामुळे स्थानिक खेळाडूंच्या गुणवत्तेच्या प्रदर्शनासाठी खूप फायदा होणार असल्याचे अतुल जैन म्हणाले.

१२ ते १७ मार्चच्या दरम्यान, जेसीएल स्पर्धा होणार असून यात आठ संघ सहभागी होणार आहेत. रोज तीन सामने होणार आहेत. यात एक सकाळी, एक दुपारी तर तिसरा सायंकाळी होणार आहे. हे सर्व सामने शहरातील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमवर होणार असून यात आयसीसीच्या सर्व नियमांचे पालन करण्यात येणार असल्याची माहिती अतुल जैन यांनी दिली. हा जळगावातील मेगा स्पोर्टींग इव्हेंट असेल असे त्यांनी आवर्जून नमूद केले.

या स्पर्धेसाठी निश्चित झालेले संघ, त्याचे मालक व संघाचा आयकॉन खेळाडू असे – संघ कोझी कॉटेज स्टायकर्स – मालक प्रकाश चौबे, आयकॉन खेळाडू शशांक अत्तरदे, संघ केके कॅन्स थंडर्स – मालक आदर्श कोठारी, आयकॉन खेळाडू, प्रद्युम्न महाजन, संघ खान्देश ब्लास्टर्स – मालक ऋषभ जैन, आयकॉन खेळाडू धवल हेमनानी, संघ एम के वारीयर्स – मालक महेंद्र कोठारी, आयकॉन खेळाडू तनेश जैन, संघ रायसोनी अॅचिव्हर्स – मालक प्रीतम रायसोनी आयकॉन खेळाडू सचिन चौधरी, संघ सिव्हर ड्रॉप हेंल्दी मास्टर – मालक धिरज अग्रवाल, आयकॉन खेळाडू विजय लोहार, संघ स्पेक्ट्रम चॅलेंजर्स – मालक दीपक चौधरी, आयकॉन खेळाडू जगदिश झोपे, संघ वनीरा ईगल्स – मालक किरण महाजन, आयकॉन खेळाडू वरूण देशपांडे.

पहा : जळगाव क्रिकेट लीगबाबत आयोजित पत्रकार परिषदेचा व्हिडीओ.

Add Comment

Protected Content