शहरात हनुमान जयंतीनिमित्ताने भाजपा महानगरतर्फे रक्तदान शिबीर

जळगाव प्रतिनिधी । कोरोना महामारीच्या काळात रक्तपुरवठा कमी झाल्यामुळे भाजपा महानगर पक्षाच्यावतीने आज महाबळ परिसर, नंदनवन कॉलनी या दोन ठिकाणी आज मंगळवारी सकाळी ९ वाजता रक्तदान शिबीराचे उद्घाटन आमदार राजूमामा भोळे, महानगरप्रमुख दीपक सुर्यवंशी यांच्याहस्ते करण्यात आले.

आज जिल्ह्यात कोरोनाने थैमान घातले आहे. त्यात रूग्ण संख्या आता दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे गरजू रूग्णांना रक्ताचा पुरवठा कमी पडत आहे. यापार्श्वभूमीवर आज मंगळवार २७ एप्रिल रोजी हनुमान जयंतीनिमित्ताने भारतीय जनता पार्टीच्या जिल्हा महानगरच्यावतीने महाबळ परिसर आणि नंदनवन कॉलनी येथे भाजपाचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार राजूमामा भोळे यांच्याहस्ते रक्तदान शिबीराचे उद्घाटन करण्यात आले. 

नंदनवन कॉलनीतील शिबीरात नगरसेविका दीपमाला काळे, धिरज वर्मा, ललित लोकचदाणी यांनी रक्तदान करून सुरुवात केली. याप्रसंगी जिल्हा सरचिटणीस विशाल त्रिपाठी, डॉ.राधेश्याम चौधरी, मंडल अध्यक्ष केदार देशपांडे, निलेश कुलकर्णी, प्रदेश महिला आघाडी उपाध्यक्षा उज्वला बेंडाळे,  विशाल पाटील, उपाध्यक्ष पिंटू काळे , जिल्हा प्रसिद्धीप्रमुख मनोज भंडारकर, मंडळ सरचिटणीस चेतन तिवारी, महिला आआघाडी अध्यक्ष दीप्ती चिरमाडे, रेखाताई वर्मा, रिक्षा आघाडी अध्यक्ष प्रतीक शेठ, जयंत चव्हाण, सागर पोळ आदी उपस्थित होते. 

तर महाबळ परिसरातील जाणता राजा चौक येथील रक्तदान शिबीर उद्घाटन प्रसंगी नितीन इंगळे, राहुल वाघ, युवा मोर्चा अध्यक्ष आनंद सपकाळे, सचिन बाविस्कर, जयंत चव्हाण, गौरव पाटील, अबोली पाटील, प्रसाद पाटील, आकाश पाटील, अमित सोळंकी,  सुरसिंग पाटील, रवींद्र कोळी, संजय तिरमले, अनंत देसाई, प्रवीण मोहोर, पंकज सावळे, चेतन अदंगले, संतोष डांबरे, भुपेश कुलकर्णी, प्रथम पाटील, अशोक महाजन, रोहित सोनवणे, रुपेश मौर्य,व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

Protected Content