मलीक नगरातून एकाची दुचाकी लांबविली

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील मलीक नगरातील बॉम्बे ब्रेकरीजवळून एकाची २५ हजार रूपये किंमतीची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी लांबविल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, सज्जाद शाह अकबर शाह (वय-२७) रा. मलीक नगर, जळगाव हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. व्यापार करून आपला उदरनिर्वाह करतात. कामासाठी त्यांच्याकडे (एमएच १९ डीएल ९०४०) क्रमांकाची दुचाकी आहे. ११ मे रोजी रात्री १०.३० वाजता त्यांनी त्यांची दुचाकी त्यांच्या घराजवळील बॉम्बे बेकरीच्या गल्लीजवळ पार्किंग करून लावली होती. अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्री २५ हजार रूपये किंमतीची दुचाकी चोरून नेल्याचे १२ मे रोजी सकाळी उघडकीला आले. त्यांनी परिसरात शोधाशोध केली परंतू दुचाकी कुठेही आढळून आली नाही. अखेर शनिवार १४ मे रोजी दुपारी एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार आनंदसिंग पाटील करीत आहे.

Protected Content