राऊतांच्या विरोधात सोमय्यांचा १०० कोटींचा दावा

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | आपल्या पत्नीवर भ्रष्टाचाराचा खोटा आरोप करून अवमान केल्यामुळे आपण खासदार संजय राऊत यांच्या विरोधात १०० कोटींचा दावा दाखल करणार असल्याची माहिती आज किरीट सोमय्या यांनी दिली आहे.

खासदार संजय राऊत आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांच्यातील वाद दिवसेंदिवस चिघळतच चाल्याचे दिसून येत आहे. या पार्श्‍वभूमिवर, सोमय्या यांनी राऊत यांना पुन्हा एकदा न्यायालयात खेचण्याची तयारी केली आहे. मिरा भाईंदर शहरात एकूण १५४ सार्वजनिक शौचालये बांधण्यात आली. त्यातील १६ शौचालये बांधण्याच कंत्राट किरीट सोमय्यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांच्या युवक प्रतिष्ठानला मिळालं होतं. बनावट कागदपत्रे सादर करून, मीरा-भाईंदर महापालिकेच्या अधिकार्‍यांची फसवणूक केली. तसेच साढे तीन कोटींपेक्षा अधिक रुपयांची शौचालयाची बिलेही घेतल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.

या प्रकरणी खासदार संजय राऊत यांनी सोमय्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. या पार्श्‍वभूमिवर, मेधा सोमय्या १८ मे रोजी सकाळी ११ वाजता शिवडी कोर्ट मुंबई येथे शिवसेना नेते संजय राऊत यांच्या विरोधात १०० कोटी रुपयांच्या शौचालय घोटाळ्याच्या नावाखाली छळ आणि बदनामी केल्याबद्दल भारतीय दंड सहिता ४९९, ५०० अंतर्गत फौजदारी मानहानीचा दावा आणि तक्रार दाखल करणार आहेत. आज किरीट सोमय्या यांनी ही माहिती पत्रकारांशी बोलतांना दिली.

या संदर्भात राऊत म्हणाले की, आपण यापूर्वीच संजय राऊत यांना मानहानी, बदनामीची नोटीस दिली आहे, मुलुंड पोलिस स्टेशन येथे तक्रार ही दाखल केली आहे. एक रुपयाचा घोटाळा झालेला नसताना, एक रुपयाचा घोटाळाचे पुरावे/ कागदपत्र नसताना संजय राऊत यांनी फक्त भीतीसाठी, बदनाम करण्यासाठी हा अपप्रचार केला आहे, असा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे.

Protected Content