एरंडोलमध्ये कोरोनाचा वाढला संसर्ग; जिल्ह्यात आज नवीन २४४ पॉझिटीव्ह

जळगाव प्रतिनिधी । आज सायंकाळी आलेल्या रिपोर्टमध्ये जिल्ह्यात २४४ नवीन कोरोना पॉझिटीव्ह आढळून आले असून यात एरंडोल तालुक्यात संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढल्याचे दिसून आले आहे.

जिल्हा माहिती कार्यालयाने आज सायंकाळी एका प्रेस नोटच्या माध्यमातून जिल्ह्यातील कोरोना बाधीतांबाबतची माहिती जाहीर केली आहे. यानुसार आज जिल्ह्यामध्ये २४४ कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण आढळून आले आहेत. यात सर्वाधीक ४३ रूग्ण हे एरंडोल तालुक्यातील आहेत. तर जळगाव शहरात ४२ रूग्ण आढळले आहेत. याच्या सोबत जळगाव ग्रामीण-९; भुसावळ-१४; अमळनेर-८; चोपडा-७; भडगाव-१५; पाचोरा-२; धरणगाव-३; यावल-२२; जामनेर-२१; रावेर-१२; पारोळा-१६; चाळीसगाव-१२; मुक्ताईनगर-९; बोदवड-७ व इतर जिल्ह्यांमधील २ असे रूग्ण आढळून आले आहेत.

आजच्या आकडेवारीने जिल्ह्यातील कोरोना बाधीतांची संख्या ही ८८४९ इतकी झाली आहे. यातील ५६३० इतके रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यात आजच १७० रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे. आजवर ४४० रूग्णांचा मृत्यू झाला असून २७७९ रूग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती या प्रेस नोटमध्ये दिलेली आहे.

एरंडोल तालुक्यात बर्‍या होण्यार्‍या रूग्णांची संख्या तुलनेत जास्त असली तरी आता तालुक्यात संसर्ग वाढीस लागल्याचे आता दिसून येत आहे. आज आढळून आलेल्या ४३ रूग्णांच्या माध्यमातून ही बाब अधोरेखीत झाली आहे.

Protected Content