जिल्हा परिषद मराठी मुलांच्या शाळा सुरु करा : कॉम्रेड अमृत महाजन

चोपडा, प्रतिनिधी । दरवर्षी १ जूनला मराठी शाळा उघडले जात परंतु यावर्षी कोरोना महामारी लाकडाउन वाढत गेलेने सर्व शाळा कॉलेज बंद आहेत व मुलांना ऑनलाइन अभ्यास शिकवला जात आहे. ज्यांच्याकडे ऑनलाईन सुविधा नाही अशा मुलांसाठी शाळा सुरु करण्यात याव्यात अशी मागणी .कॉम्रेड अमृत महाजन यांनी केली आहे.

ज्यांचेकडे ऑनलाईन सुविधा आहे. ऑनराईड मोबाईल आहे व ज्या पाल्यांचे पालक मार्गदर्शन करण्यात सक्षम आहेत अशांनाच ते शक्य आहे. परंतु लाखो दलित आदिवासी गरीब वर्गातील मुलांच्या बाबतीत ते शक्य नाही म्हणून जिल्हा परिषदेच्या मराठी शाळा शिकणारे मुलांपैकी निम्मी मुले हे शहरात इंग्लिश मिडीयमच्या व खाजगी शाळांमध्ये शिकतात आणि गावी फक्त निर्मिती गरिबांची मुले आहेत. उदाहरणार्थ एखाद्या गावी शंभर मुले शिकत आहेत त्यातील पन्नास मुलं शहरात खाजगी शिक्षण संस्थान कडे गेलेले आहेत आणि पन्नास मुलं त्या गावी आहेत तसेच पूर्वी त्या गावांला शाळेच्या दोन किंवा तीन खोल्या होत्या तेथे आता ४ते६ खोल्या झालेल्या आहेत म्हणजे जागा मुबलक उपलब्ध आहे म्हणून या जिल्हा परिषदेच्या शाळा या दोन दोन वर्ग एका दिवसात अशा तर्‍हेने सुरू केल्यास मुलांचं शिक्षण होईल व शारीरिक आंतरही राखले जाईल अशा बेताने सुरू कराव्यात अशी विनंती भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते कॉम्रेड अमृत महाजन यांनी केली आहे…

Protected Content