Home क्राईम दुचाकीच्या धडकेत महिला शेतकरी जखमी

दुचाकीच्या धडकेत महिला शेतकरी जखमी

0
100

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शेतात पायी जात असलेल्या शेतकरी महिलेला दुचाकीने धडक दिल्याने महिला जखमी झाल्याची घटना गुरुवार, २२ जून रोजी सकाळी सव्वा दहा वाजेच्या सुमारास जळगाव तालुक्यतील भोलाणे गावाजवळ रस्त्यानजीक घडली. लक्ष्मी दिपक कोळी वय २८ रा. भोलाणे ता.जळगाव असे जखमी महिलेचे नाव आहे.

 

भोलाणे गावात लक्ष्मी दिपक कोळी वय २८ या वास्तव्यास आहेत. त्या गुरुवारी सकाळी सव्वा दहा वाजेच्या सुमारास पायी शेतात जात होत्या. यादरम्यान रस्त्यात एका शेताजवळ त्यांना मागून एका भरधाव दुचाकीने धडक दिली. या घटनेत लक्ष्मी कोळी या जखमी झाल्या आहेत. अपघातानंतर दुचाकीस्वार हा घटनास्थळावरुन पळून गेला. या अपघाताबाबत लक्ष्मी कोळी यांनी दिलेल्या तक्रारीवरुन अज्ञात दुचाकीस्वाराविरोधात जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पुढी तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल बापू कोळी हे करीत आहेत.


Protected Content

Play sound