मानव अधिकार सुरक्षा संघाकडून प्रमाणपत्रासह मास्क व सॅनिटाझर वाटप

चाळीसगाव, प्रतिनिधी । कोरोना काळात ईश्वरसेवा बजावणारे वर्धमान धाडीवाल यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शहरात भव्य रक्तदान शिबिरात दात्यांचे मनोबल वाढवण्यासाठी मानव अधिकार सुरक्षा संघाकडून प्रमाणपत्रासह मास्क व सॅनिटाझर वाटप करण्यात आले आहे.  

 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोरोनाबाधित रूग्णांची गैरसोय होऊ नये म्हणून प्रसिद्ध उद्योजक वर्धमान धाडीवाल यांनी रूग्णांना मोफत जेवणाची व्यवस्था केली आहे. रूग्णांचा किंवा नातलगांचा फोन येताच त्यांना थेट दवाखान्यात जेवणाचा डबा पोहोचवला जातो. त्यांच्या या ईश्वरसेवा बद्दल सर्वत्र कौतुक होत आहे. अशा या अवलियाचा वाढदिवस शुक्रवार, २१ रोजी संपन्न झाला. या दिवसाचे औचित्य साधून वर्धमान धाडीवाल मित्र मंडळ, सह्याद्री प्रतिष्ठान व संभाजी सेना यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.

 

या शिबिराचे आयोजन शहरातील जीवन सुरभी ब्लङ बॅंक येथे करण्यात आले. सकाळी १० ते दुपारी ३ वाजेदरम्यान रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी दात्यांचे मनोबल वाढवण्यासाठी मानव अधिकार सुरक्षा संघाकडून प्रमाणपत्र मास्क व सॅनिटाझरचे वाटप करण्यात आले. यावेळी एकूण २५ जणांना प्रमाणपत्र, मास्क व सॅनिटाझरचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी मानव अधिकार सुरक्षा संघाच्या वतीने रश्मी लोडाया (जैन), मणिषा पंकज पाटील, स्मिता दिपक पाटील, सविता आनंद सोनवणे, कविता जाधव, राणी सोनी व वैशाली सोनवणे आदी उपस्थित होते.

Protected Content