यावल तालुक्यात आरोग्य विभागाची कार्यवाही

यावल – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । तालुक्यातील बोगस डॉक्टरासंदर्भात आरोग्य विभागाकडे तक्रार केल्याने तालुका आरोग्य अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली चौकशी करण्यात आली. या चौकशीत एका बोगस वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या डॉक्टराला नोटीस तर एका डॉक्टरने पळ काढल्याचे वृत्त सुत्रांकडून मिळाले आहे.

या संदर्भात यावल तालुका आरोग्य विभागाच्या सुत्रांकडुन मिळालेल्या माहीती अनुसार कोरपावली तालुका यावल येथे वैद्यकीय व्यवसाय करणारे बोगस डॉक्टर बिहयुत बिस्वास यांच्या दवाखान्या बाबत आणी मोहराळा गावातील नागरीकांच्या तक्रारी वरून यावल तालुका आरोग्य अधिकारी डॉ. गफुर तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका विस्तार अधिकारी डी. सी. पाटील, तालुका आरोग्य सहाय्यक जयंत पाटील, सावखेडा सिम येथील वैद्यकीय अधिकारी तसेच आरोग्य सेवक नाले यांच्या पथकाने मोहराळा गावातील भास्कर विठु चौधरी यांच्या घरात वैद्यकीय व्यवसाय करणारे डॉक्टर यांच्या संदर्भात माहीती घेवुन चौकशी करण्यास गेले असता संबधीत त्या बोगस डॉक्टरांनी पळ काढल्याचे दिसुन आले तर कोरपावली गावात वैद्यकीय व्यवसाय करणारा बंगाल राज्यातील राहणारा बोगस डॉक्टरांचे जोडपे उपचार करीत असल्याच्या तक्रारीवरुन कोरपावली भेट दिली असता , तक्रारी अनुसार संबधीत त्या बोगस डॉक्टराचे कागदपत्र आरोग्य विभागाच्या वतीने ताब्यात घेण्यात आले.

सदरचे वैद्यकीय व्यवसायाचे कागदपत्र हे पुढील चौकशी करीता वरिष्ठांकडे पाठविण्यात आले असुन , वरिष्ठांकडुन पुढील अहवाल सादर होईपर्यंत आपण आपला व्यवसाय बंद करावा, अशी समज त्या बोगस डॉक्टरास देण्यात आली आहे. यावल तालुका आरोग्य विभागाच्या माध्यमातुन वैद्यकीय व्यवसाय बंद ठेवण्याबाबत नोटीस देण्यात आली असतांना सुद्या संबधीत नोटीसीला न जुमानता कोसपावलीच्या त्या डॉक्टर आपला बोगस वैद्यकीय व्यवसाय सुरूच ठेवल्याचे वृत्त आहे .

 

Protected Content