बोदवड प्रतिनिधी । बोदवड येथील सामाजिक कार्यकर्ते सचिन उगले यांच्या माध्यमातून दिव्यांग बांधवांना बोदवड शहरात फॉर्म वाटप करण्यात येत आहे.
कोळी महासंघाच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. बोदवड तालुकाध्यक्ष सुरेश कोळी, हिंदू एकता पक्षाचे जिल्हाध्यक्ष अनिल देवकर, थर्ड आयचे संपादक नंदलाल पठ्ठे, संजय कोळी, सतीश बाविस्कर यांच्याहस्ते बोदवड शहरात नगरपंचायत व ग्रामीण ग्रामपंचायत भागातील दिव्यांग बांधवांना ५ टक्के निधी मिळावा याबाबत त्यांना मोफत फार्म देण्यात आले. याप्रसंगी लाभार्थी विष्णू सपकाळ, सुरेश भोबे पारूबाई, बडगुजर काका, मनोज शर्मा, संजू कोळी यांच्यासह आदी दिव्यांग बांधव उपस्थित होते.