पाचोऱ्यातील गो.से.हायस्कूल येथे संत रविदास महाराज यांना अभिवादन

पाचोरा – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित, श्री. गो से हायस्कूल पाचोरा येथे, “मन चंगा तो कठोती में गंगा” असा संदेश देणारे थोर संत गुरु रविदास महाराज यांच्या ६४५ व्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले.

संत गुरु रविदासजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमेस माल्यार्पण करण्यात आले. याप्रसंगी मुख्याध्यापक सुधीर पाटील, उपमुख्याध्यापिका प्रमिला वाघ, पर्यवेक्षक आर. एल. पाटील, एन. आर. पाटील. तसेच ए. बी. अहिरे, सांस्कृतिक विभाग प्रमुख आर. बी. तडवी, कार्यालय प्रमुख अजय सिनकर, टेक्निकल विभाग प्रमुख एस. एन. पाटील, किमान कौशल्य विकास प्रमुख मनीष बाविस्कर तसेच ज्येष्ठ शिक्षक महेश कौण्डिंन्य, बी. एस. पाटील, सुनिल भिवसने, सुबोध कांतायन, प्रशांत नैनाव, प्रदीप पाटील, एम. एन. देसले, अनिल पाटील, महेश चिंचोले , डिगंबर टोनपे, पी. एस. पाटील, उज्वल पाटील, धनंजय पाटील, धनराज सोनवणे, श्रीकांत अहिरे, ईश्वर पाटील, जगदीश ब्राह्मणे सह शिक्षक – शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांच्या उपस्थित करण्यात आले.

Protected Content