वाळू घाटांचा लवकर लिलाव करावा अन्यथा आंदोलन – बहुजन मुक्ती पार्टी

मुक्ताईनगर, लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । तालुक्यामध्ये वाळू घाटांचा लिलाव तीन वर्षापासून करण्यात आलेला नसल्याने मुक्ताईनगर तालुक्यामध्ये वाळू टंचाई असल्यामुळे विकास कामांना खीळ बसली आहे. वाळू घाटांचा लवकर लिलाव करावा अन्यथा आंदोलन करण्यात येईल असा इशारा येथील बहुजन मुक्ती पार्टीने निवेदनाद्वारे दिला आहे.

मुक्ताईनगर तालुक्यामधील वाळूचे ठेके सरकारी निर्देशानाच्या अंतर्गत सुरू करण्यात यावे जेणेकरून जे बांधकाम करणारे मिस्त्री, मजूर वर्ग यांना पोट भरण्याचे साधन उपलब्ध होईल. मुक्ताईनगर शहर, तालुक्यात मोठ्या प्रमाणात सरकारी निमसरकारी विकास कामे सुरू आहेत. तसेच मोठ्या प्रमाणात घरकुलाचे कामेसुद्धा सुरू आहेत. मुक्ताईनगरमध्ये नगरपंचायतच्या अंतर्गत सांडपाण्याची व्यवस्था निर्माण करण्यासाठी गटारीचे कामे सुरू आहेत. ह्या कामासाठी वाळू आवश्यक असते. गेल्या तीन वर्षापासून वाळू घाटात लिलाव अजून पर्यंत झालेला नाही. वाळूचा ठेका जो दिला जात असतो तो सुद्धा अजून पर्यंत दिलेला नाही. त्यामुळे बांधकाम व्यवसायिक आणि त्या व्यवसायावर अवलंबून असणारे मजूर व बांधकाम करणारे मजूर हजारो लाख लोकांवर उपासमारीची वेळ आलेली आहे.

घरकुला विकास कामे त्याच पद्धतीने नालीची कामेसुद्धा विलंबित आहेत. शासनाला मोठ्या प्रमाणात महसूल मिळाला असता तरी तात्काळ वाळू घाटांचा लिलाव करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली असून असे न झाल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल . असा इशारा व निवेदनद्वारे मुक्ताईनगर तहसीलदार यांना देण्यात आला आहे.

सदर निवेदनाची माहिती प्रत महाराष्ट्र मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, महसूल मंत्री, जिल्हाधिकारी साहेब यांना तहसीलदारांमार्फत रवाना करण्यात आलेली आहे. निवेदन देताना जुबेर अली शेख जाकीर शेख जाबीर, इरफान बागवान, फैजल खान बिस्मिल्ला खान, इरशाद खान, इस्माइल खान, इस्माईल शेख रशीद, शेख साबीर शेख शब्बीर, इरफान खान, जावेद खान, इरफान बागवान, युनूस खान मेहबूब खान, नूर मोहम्मद खान, शेख वाजिद शेख शब्बीर, हकीम आर चौधरी, अनु पेंटर, बांधकाम ठेकेदार आणि कामगार आणि कार्यकर्ते उपस्थित होते

Protected Content