उध्दव ठाकरेंनीच अफजलखानाच्या कबरीभोवतीच्या अतिक्रमण होऊ दिलं : बावनकुळे

 

सातारा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | उध्दव ठाकरे यांच्यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी येथे पत्रकारांशी बोलतांना गंभीर आरोप केला आहे.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आज सातारा दौर्‍यावरत आहेत. येथे पत्रकारांशी संवाद साधतांना ते म्हणाले की, मतांच्या लालसेपोटी उद्धव ठाकरेंनी अफजल खान कबर परिसरातील अतिक्रमण काढण्यासाठी ठोस भूमिका घेतली नाही. यासोबत त्यांनी प्रतापगडावरील अफजल खान कबर परिसरातील अतिक्रमण काढल्यानं बावनकुळेंनी शिंदे-फडणवीस सरकारचं कौतुक करत आभार मानले.

दरम्यान, तापगड परिसरात असलेल्या अफजल खानच्या थडग्याजवळचं अनधिकृत बांधकाम पोलीस बंदोबस्तात रातोरात हटवण्यात आलं. त्यानंतर या ठिकाणी जमावबंदीचं कलम १४४ लागू करण्यात आलं. अतिक्रमण पाडण्यासाठी बुधवारी रात्रीपासूनच जोरदार तयारी सुरू झाली होती. यानंतर काल अतिक्रमण काढण्यात आले असून यासाठी भाजपने मविआ सरकारला जबाबदार धरले आहे. यातच या कारवाईनंतर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया देत ठाकरे सरकारवर निशाणा साधलाय.

Protected Content