मतदान केंद्रावर नियुक्त कर्मचाऱ्यांना ईव्हीएम व साहित्याचे वाटप

भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | रावेर लोकसभा मतदारसंघात १३ मे रोजी मतदान होणार आहे. मतदारसंघातील १ हजार ९८२ मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया पार पाडली जाणार आहे. याच पार्श्वभूमीवर मतदान केंद्रावर नियुक्त करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना १२ मे रोजी आज ईव्हीएम व इतर मतदानाच्या साहित्याचे वाटप करण्यात आले.
रावेर लोकसभा मतदारसंघात एकूण १८ लाख ११ हजार ९५१ मतदार असून यात ९ लाख ७० हजार ५४ पुरूष तर ८ लाख ७४ हजार ८४३ महिला आणि ५४ तृतीयपंथी १३ मे रोजी आपला मतदानाचा हक्क बजावणार आहे. प्रत्येक मतदान केंद्रावर कडक पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे.

Protected Content