इंदूरमध्ये काँग्रेसचा ‘नोटा’ला मतदान करण्यासाठी प्रचार

इंदूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | लोकसभा निवडणूक तोंडवर असताना मध्य प्रदेश राज्यातील इंदूर मतदारसंघाच्या काँग्रेस उमेदवार अक्षय कांती बम यांनी शेवटच्या क्षणी माघार घेतल्याने आण‍ि पर्यायी उमेदवाराचा अर्ज बाद झाल्याने काँगेसने नोटासाठी प्रचार सुरू केला आहे. स्वत:चा उमेदवार निवडणूकीत नसल्याने काँग्रेस प्रचार करत आहे. काँग्रेस मतदारांना १३ मे रोजी नोटा समोरील बटन दाबा आणि भाजपला धडा शिकवा असे आवाहन करीत आहे.
यासाठी भिंतीवर आणि ऑटो रिक्षावर पोस्टर देखील चिकटवले जात आहे. भाजपाने विद्यमान खासदार शंकर लालवानी यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे. इंदूर मध्य प्रदेशातील सर्वांत मोठा लोकसभा मतदारसंघ आहे. इंदूरमध्ये २५.१३ लाख मतदार आहेत. काँग्रेस उमेदवाराने शेवटच्या क्षणी माघार घेतल्याने ही निवडणूक एकतर्फी होईल, असे बोलले जात होते. मात्र, काँग्रेस ‘नोटा’साठी प्रचार करून भाजपासमोर मोठे आव्हान उभे करताना दिसत आहे.

Protected Content