थकीत पगार देण्यात यावा; सेवानिवृत्त एसटी कर्मचाऱ्यांची मागणी

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | जळगाव बस आगारातून सेवानिवृत्त झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांचा थकीत पगार देण्यात यावा. या मागणीसाठी सेवानिवृत्त एसटी कर्मचाऱ्यांनी बुधवार, दि. २८ सप्टेंबर रोजी दुपारी ४ वाजता आगाराचे विभाग नियंत्रक भगवान जगनोर यांची भेट घेवून चर्चा केली आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी की, “जळगाव बस आगारातून बस चालक आणि वाहक म्हणून सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना गेल्या काही महिन्यांपासून त्यांचे थकीत रक्कम देण्यात आलेली नाही. त्यांच्या नियमानुसार सेवानिवृत्ती वेतन देण्यात येत नाही. त्यामुळे सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा अडचणींचा सामना करावा लागत आहे. शिवाय काढलेले कर्ज फेडण्यासाठी कोणतीही उत्पन्नाचे साधन नसल्याने कर्मचाऱ्यांना आत्महत्या करण्याची वेळ आली आहे. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना बाहेरगावी जाण्यासाठी मोफत पास देखील देण्यात आलेली नाही.

यासंदर्भात सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी अनेक वेळा यासंदर्भात निवेदने, विनंती अर्ज करूनही याकडे साफ दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे तातडीने सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य करून थकीत रक्कम, पेन्शन योजना यासह इतर मागण्या पूर्ण कराव्यात. अशी मागणी केली. बुधवारी २८ सप्टेंबर रोजी दुपारी ४ वाजता सेवानिवृत्त कर्मचारी यांनी विभाग नियंत्रक भगवान जगनोर यांची भेट घेवून मागणीसंदर्भात चर्चा केली.”


Protected Content