Home Cities जळगाव भारतीय जनता पार्टी महिला मोर्चातर्फे शहरात ‘वंदे मातरम रॅली’

भारतीय जनता पार्टी महिला मोर्चातर्फे शहरात ‘वंदे मातरम रॅली’

0
56


जळगाव  – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्त भारतीय जनता पार्टी महिला मोर्चातर्फे आज शहरात ‘वंदे मातरम रॅली’ काढण्यात आली.

आज दि. १४ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता छत्रपती शिवाजी महाराज पुतळा कोर्ट चौक, साईबाबा मंदिर, गणेश कॉलनी रोड येथे प्रदेश उपाध्यक्ष उज्वला बेंडाळे, माजी महापौर सीमा भोळे, यांच्या नेतृत्वात महिला आघाडी जळगाव तर्फे “वंदे मातरम” च्या घोषणा देत रॅली’ काढण्यात आली.

यात महानगराध्यक्ष दीप्ती चीरमाडे, सरचिटणीस रेखाताई वर्मा, नीतू परदेशी, सरोज पाठक, नगरसेविका गायत्री राणे, जिल्हा पदाधिकारी वंदना पाटील, नीलाताई चौधरी, ज्योती निंभोरे, रेखा कुलकर्णी, रुकैया बी, पूजा पाटील, पूजा चौधरी, संगीता पाटील, अंजली धावसे, ज्योती लोखंडे, जयश्री पाटील, कविता चौधरी, रेखा भावसार, स्वाती नेहते, मृदुला कुलकर्णी, अर्चना पाटील, शीला पाटील, लता रायसिंगे, प्रतिभा काळे, शारदा धांडे, कविता बाविस्कर, सरिता बारी, ज्योती महाजन, मनीषा विधाते, दिपाली कांबळसकर आदि महिला प्रतिनिधींनी सहभाग घेतला.


Protected Content

Play sound