औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये जिल्हास्तरीय कौशल्य स्पर्धेचे आयोजन

iti 300x249

जळगाव प्रतिनिधी । जागतिक कौशल्य स्पर्धा 2020-2021 मध्ये आयोजित केलेल्या कौशल्य स्पर्धा पुर्व तयारीच्या दृष्टीने 50 क्षेत्रांशी संबंधित जिल्हा व राज्यस्तरावर व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय,विविध औद्योगिक आस्थापना यांच्या सहकार्याने महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी मार्फत आयोजित करण्यात आली आहे.

राष्ट्रीय कौशल्य विकास परिषदेमार्फत प्राप्त मार्गदर्शन सूचनेनुसार स्पर्धेचे आयोजन जिल्हा, विभाग , राज्य आणि देश पातळीवर करण्यात येवून त्यातून निवड केलेल्या उमेदवारांची नावे पुढील जागतिक नामांकनासाठी पाठविण्यात येतील. जिल्हास्तरीय कौशल्य स्पर्धेचे आयोजन 1 जानेवारी ते 15 फेब्रुवारी 2020 या दरम्यान संबंधित जिल्हास्तरीय / विभागातील औद्योगिक प्रशिक्षण संस्था तसेच तांत्रिक विद्यालयांच्या ठिकाणी आयोजन करण्यात आले आहे.

जिल्हास्तरीय कौशल्य स्पर्धा 2021 साठी वयोमर्यादा हा एकमेव निकष ठरविण्यात असून स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी उमेदवाराचा जन्म 1 जानेवारी 1999 किंवा त्यानंतरचा असणे आवश्यक आहे. तर एअरक्राफ्ट मेंटेनन्स, मेकाट्रानिक्स ,इन्फॉरमेशन नेटवर्क केबलिंग,मॅन्युफॅक्चरिंग टीम चॅलेंज, वॉटर टेक्नॉलॉजी, क्लाऊज कंप्यूटिंग आणि सायबर सिक्युरिटी या क्षेत्राकरीता उमेदवाराचा जन्म जानेवारी 1996 किंवा त्यांनंतरचा असणे आवश्यक आहे.

Protected Content