महात्मा फुले हायस्कूलमध्ये शैक्षणिक साहित्याचे वाटप

धरणगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | येथील मुन्नादेवी अँड मंगलादेवी फाऊंडेशन वतीने महात्मा फुले हायस्कूल धरणगाव येथे ‘एक कदम शिक्षा की ओर’ ज्योती स्मृती उपक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना शाळेतील शिक्षक पी.डी.पाटील यांनी सामाजिक कार्याचे विविध उदाहरणे देत माहिती विशद केली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक जे.एस.पवार होते. कार्यक्रमास फाऊंडेशनचे संस्थापक जीवनआप्पा बयस, तेजंद्र चंदेल, गोविंद पुरभे, सचिव मुकेश बयस, दुर्गेश बयस, धीरेंद्र पुरभे, प्रा.जितेंद्र बयस, मोहनीश चंदेल, हर्षल बयस आदींची उपस्थिती होती.

सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते महात्मा ज्योतिराव फुले व क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. सर्व मान्यवरांच्या हस्ते शाळेतील गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.

प्रा. जितेंद्र बयस यांनी संस्थेचे सामाजिक कार्य विशद केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे मुख्याध्यापक जे.एस.पवार यांनी फाउंडेशनचे आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख एस.एन.कोळी यांनी तर  आभार प्रदर्शन क्रीडा शिक्षक एच.डी.माळी यांनी केले.

Protected Content