डॉ. उल्हास पाटील फिजिओथेरेपी महाविद्यालयात रंगली मराठी काव्य वचन स्पर्धा

जळगाव -लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपी महाविद्यालयात न्युरोफिजिओथेरपी विभागा तर्फे डॉ अस्मिता काडेल यांच्या मार्गदर्शना खाली मराठी भाषा गौरव दिन निमित्त मराठी कव्या वचन स्पर्धा घेण्यात आली.

यास्पर्धे मध्ये विद्यार्थ्यानी स्पर्धेला उत्तम प्रतिसाद देत मराठी काव्य वचन केले स्पर्धेचे उद्घाटन कॉलेज चे प्राचार्य डॉ. जयवंत नगूलकर यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करून करण्यात आले. यावेळी बोलतांना डॉ. नगुलकर यांनी मराठी भाषा ही काळाच्या ओघात क्षीण न होउ देता आपण तिला जपायला हवी, मराठी ही आपली अस्मिता असून तिच्या काव्य आणि लिखानाची प्रतिभाच वेगळी आहे. या स्पर्धेत एकूण १५ विद्यार्थ्यानी सहभाग नोंदवत वचन केले. त्यापैकी अंतिम वर्षातील विद्यार्थी अंकित राऊत याला प्रथम क्रमांक तसेच दूसरा क्रमांक तृतीय वर्षातील सुमेधा भावसार आणि अंतिम वर्षातील हेमंगी चौधरी हिने तिसरा क्रमांक पटकावला.विजेत्यांचे प्रशस्ती पत्र देवून कौतुक करण्यात आले. कार्यक्रमला डॉ अंकित माने, डॉ.चैताली नेवे, डॉ. वृषाली मुगल हे उपस्तीत होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचाल व आभार प्रदर्शन डॉ. अक्षता माहा यांनी केले.

Protected Content