जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील खंडेराव नगर परिसरातून तरुणाची दुचाकीची चोरी केल्याची घटना उघडकीला आले आहे. या संदर्भात चौकशी अंती अखेर मानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, ललित अरुण पाटील वय-३८ रा. वासुदेव पार्क, आशाबाबा नगर, जळगाव हा तरुण हातमजुरीचे काम करून तो आपला उदरनिर्वाह करतो. २ फेब्रुवारी रोजी रात्री १०.३० वाजता त्यांनी त्याची दुचाकी (एमएच १९ डीए २२२०) ही घराच्या समोर पार्किंगला लावली होती. दरम्यान अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्री ही दुचाकी चोरून नेली. हा प्रकार दुसऱ्या दिवशी ३ फेब्रुवारी रोजी पहाटे ३ वाजता उघडकीला आला. दरम्यान परिसरात सर्वत्र शोध घेतल्यानंतर दुचाकी कुठेही मिळून आले नाही म्हणून अखेर बुधवारी २८ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता रामानंदनगर पोलीस ठाण्यात धाव घेवून घेऊन तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांवर रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक रेवानंद साळुंखे हे करीत आहे.