विवेकानंद प्रतिष्ठान पुरस्कृत केएकेपी महाविद्यालयात ‘वाचन प्रेरणा’ पुरस्कार वितरण

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी |  डॉ. ए. पी. जे अब्दुल कलाम यांची जयंती आणि वाचन प्रेरणा दिनानिमित्त केएकेपी महाविद्यालयाच्या  ग्रंथालय विभागाच्या वतीने डॉ. अब्दुल कलाम यांच्या जीवनावर आधारित प्रश्नमंजुषा घेण्यात आली.   या  प्रश्नमंजुषेत प्रथम तीन क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

 

डॉ. अब्दुल कलाम यांच्या जीवनावर आधारित प्रश्नमंजुषेत विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.  त्यापैकी ज्युनिअर आणि सिनिअर विभागातून प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यात सिनिअर विभागात जान्हवी हिरालाल पाटील हिने प्रथम तर आकाश डोहारे याने द्वितीय क्रमांक पटकविला. ज्युनिअर विभागात प्रथम क्रमांक प्रियंका छगनलाल सैनी हिने, द्वितीय क्रमांक गौरी बागुल हिने तर तृतीय क्रमांक ऋतुजा साळुंखे हिने पटकविला.

सर्व विजेत्यांना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर पाठक यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. याप्रसंगी कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य उमेश इंगळे, ग्रंथपाल व विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. हितेश ब्रिजवासी, क्रीडा संचालक डॉ. संतोष बडगुजर यांची उपस्थिती होती. तर  सूत्रसंचालन मुरलीधर चौधरी यांनी केले  यशस्वीतेसाठी शिक्षक हितेंद्र सरोदे,   कल्पना पाटील, सागर पाटील आदींनी सहकार्य केले

 

Protected Content