संघटनेने घेतली एसटी कर्मचाऱ्यांच्या आर्थिक नुकसानाची जबाबदारी तर परबांनी दिला निर्वाणीचा इशारा

मुंबई वृत्तसंस्था | संघटनेने आता स्वतः एसटी कर्मचाऱ्यांच्या आर्थिक नुकसानाची संपूर्ण जबाबदारी घेतली असल्यामुळे संपकरी कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला आहे; तर दुसरीकडे परिवहन मंत्री अनिल परबांनी कर्मचाऱ्यांना रुजू होण्यासाठीची शेवटची संधी असल्याचे म्हटले आहे.

एसटी महामंडळाला संपाची नोटीस देणारे अजय गुजर यांची बुधवारी अनिल परब यांच्याबरोबर बैठक झाली परंतु विलीनीकरण बाबत एकमत न झाल्यामुळे ते परत आजाद मैदानावर असून एसटी कर्मचाऱ्यांचे कोणतेही नुकसान झाल्यास त्यास आम्ही जबाबदार राहू असे वक्तव्य केल्यामुळे मैदानावरील कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला. तर परिवहन मंत्री अनिल परब यांनी पत्रकार परिषद घेऊन येत्या सोमवारपर्यंत रुजू होणाऱ्या कर्मचाऱ्यांना तात्काळ रुजू करून घेण्याचे आदेश सर्व व विभाग नियंत्रकांना दिलेत. सोमवार नंतर मात्र यापेक्षाही कठीण कारवाई केली जाईल असे संकेत त्यांनी यावेळी दिले.

गेल्या 40 दिवसांपासून एसटी महामंडळाचे हजारो कर्मचारी विलीनीकरणाच्या मागणीसाठी संपावर गेलेले आहेत. यासंदर्भात विविध संघटना नेत्यांशी राज्य सरकारने चर्चा करून देखील हा तिढा सुटलेला नाही. एसटी महामंडळाने 19 हजारपेक्षा जास्त कर्मचारी हजर झाल्याचे जाहीर जरी केले असले तरी देखील मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू झालेली नाही. हजर झालेले बहुतांशी कर्मचारी हे लिपिक व मेकॅनिक असल्यामुळे लालपरीला अजूनही चालक वाहकांची प्रतीक्षा आहे.

एसटी महामंडळाला संपाची नोटीस देणारे महाराष्ट्र राज्य कनिष्ठ वेतन श्रेणी संघटनेचे नेते अजय गुजर यांची बुधवारी अनिल परब यांच्याबरोबर बैठक झाली परंतु विलीनीकरण बाबत एकमत न झाल्यामुळे अजय गुजर हे परत आजाद मैदानावर परतले. तत्पूर्वी अजय गुजर व त्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांच्यातील काही ध्वनिफिती सोशल मीडियावर प्रसारीत झाल्यामुळे गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.

गुजर यांनी परतल्यानंतर यासंदर्भात स्पष्टीकरण देऊन एसटी कर्मचाऱ्यांचे कोणतेही नुकसान झाल्यास त्यास गुणरत्न सदावर्ते व ते स्वतः जबाबदार राहणार असल्याचे वक्तव्य केल्यामुळे मैदानावरील कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला. याप्रसंगी बोलताना त्यांनी आंध्रप्रदेशचा दाखला देऊन नमूद केले की या राज्यात 50 हजार कर्मचाऱ्यांवर प्रशासकीय कारवाया झालेल्या होत्या त्या मानाने महाराष्ट्रात केवळ दहा हजार कर्मचाऱ्यांवर कारवाया झालेल्या आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी कोणत्याही आमिषाला बळी न पडता विलीनीकरणाच्या मुद्द्यावर ठाम राहावे असे आवाहन त्यांनी याप्रसंगी केले.

एसटी महामंडळाला संपाची नोटीस देणारे अजय गुजर यांची बुधवारी अनिल परब यांच्याबरोबर बैठक झाली परंतु विलीनीकरण बाबत एकमत न झाल्यामुळे ते परत आजाद मैदानावर असून एसटी कर्मचाऱ्यांचे कोणतेही नुकसान झाल्यास त्यास आम्ही जबाबदार राहू असे वक्तव्य केल्यामुळे मैदानावरील कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला. तर परिवहन मंत्री अनिल परब यांनी पत्रकार परिषद घेऊन येत्या सोमवारपर्यंत रुजू होणाऱ्या कर्मचाऱ्यांना तात्काळ रुजू करून घेण्याचे आदेश सर्व व विभाग नियंत्रकांना दिलेत. सोमवार नंतर मात्र यापेक्षाही कठीण कारवाई केली जाईल असे संकेत त्यांनी यावेळी दिले.

Protected Content