पोटॅश व मिश्र खतांच्या वाढीबाबत रावेर ऍग्रो एजन्सीचे निवेदन

रावेर, प्रतिनिधी | तालुक्यात गेल्या काही महिन्यांपासून पोटॅश व मिश्र खतांचा तुटवडा मोठ्या प्रमाणात जानवत आहे. यामुळे तातडीने गैरसोय दूर करून मुबलक साठा उपलब्ध करावे या आशयाचे निवेदन रावेर ऍग्रो एजन्सीने निवेदनाद्वारे मागणी केली आहे.

तालुक्यात गेल्या महिनाभरापासून रब्बी हंगामासाठी जसे गहू, हरभरा, मका, कांदा व मुख्य पीक केळीसाठी रासायनिक खतांपैकी डीएपी, १०२६२६, पोटॅश या प्रमुख खतांचा तीव्र तुटवडा जाणवत आहे. याबाबत रावेर ऍग्रो डीलर्स असोसिएशन तर्फे तालुकाध्यक्ष सुनिल कोंडे यांनी जिल्हा कृषी विकास अधिकारी वैभव शिंदे यांना निवेदनाद्वारे तालुक्यात पोटॅशची वाढीव मागणी करणारे निवेदन दिले आहेत. दरम्यान केळी निसवण सुरू असून पोटॅशचा मोठा तुटवडा आहे. असे असतांना रासायनिक खत कंपन्यांकडून जिल्ह्यात रासायनिक खतांचा रॅक येत नसल्याने सर्व शेतकरी पोटॅश व डीएपी साठी फिरत आहेत. मात्र रॅकच नसल्याने कृषी विक्रेते हतबल झाले आहेत. जिल्ह्यात रावेर व यावल तालुका केळी उत्पादनात अग्रेसर असून तालुक्यात पोटॅशची मागणी मोठी आहे. त्या अनुषंगाने विक्रेत्यांना पोटॅशची स्पेशल रॅक उपलब्ध करून द्यावी किंवा जास्तीत जास्त पुरवठा रावेर तालुक्याला द्यावा अशी आग्रहाची विनंती असोसिएशन तर्फे कोंडे यांनी केली आहे. निवेदनाची प्रत, खा.श्रीमती रक्षाताई खडसे, आ.शिरिष चौधरी, जिल्हाधिकारी अभिजित राऊत, जिल्हा कृषी अधीक्षक ,माफदा चे राज्याध्यक्ष विनोद तराळ यांनाही देण्यात आले आहे. वरील मागणी हि सुनील कोंडे तालुकाध्यक्ष (रावेर ऍग्रो डीलर्स असो. रावेर) यांनी निवेदनाद्वारे केली आहे. तत्पूर्वी तुटवडा पाहता पोटॅश उत्पादक कंपन्यांची बैठक बोलावली असल्याचे कृषी बिकास अधिकारी वैभव शिंदे यांनी रावेर ऍग्रो डीलर्स असोसिएशनला कळविले आहे.

Protected Content