शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त दिनदर्शिकेचे प्रकाशन

सावदा ता. रावेर प्रतिनिधी । राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सालाबादप्रमाणे यावर्षीही दिनदर्शिका तयार केल्या असून त्या दिनदर्शिकेचे आज प्रकाशन पुणे येथे दुपारी २:०० वा. राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे हस्ते संपन्न झाले.

याप्रसंगी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, राज्यमंत्री दत्ता भरणे, जि.प.अध्यक्षा निर्मलताई पानसरे तसेच मावळचे आमदार सुनिल शेळके तथा विवीध मान्यवर उपस्थीत होते. सदर कार्यक्रमाचे आयोजन सावदा येथील नगराध्यक्ष राजेश वानखेडे, संजय चव्हाण, विजयभाऊ चौधरी यांच्यासह आदींनी उपस्थिती दिली.

Protected Content