भडगाव पोलिसांतर्फे गरजूंना शिरखुर्मा साहित्य वाटप

भडगाव, प्रतिनिधी । कोरोनाचा वाढता प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर रमजान निमित्ताने  भडगाव पोलीस स्टेशनतर्फे यावर्षी इफ्तार पार्टी आयोजन  न करता रमजान ईदसाठी शिरखुर्मा साहित्याचे किराणा किट वाटप करण्यात आले. 

भडगाव पोलीस स्टेशनच्या वतीने शहरात जातीय सलोखा राहवा यासाठी दरवर्षी पोलीस स्टेशनच्या वतीने पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली इफ्तार पार्टीचे आयोजन  करण्यात येते. मात्र यंदा कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव असल्याने इफतार पार्टीचे आयोजन न करता मुस्लिम समाजातील गरीब नागरिकांना पोलीस स्टेशनला बोलून रमजान ईदच्या दिवशी शीरखुर्मा तयार करण्यासाठी लागणारी आवश्यक साहित्याचे किराणा किटचे वाटप करण्यात आले.  त्यावेळी मुस्लिम पंचकमिटीतील इम्रान अली शहादत अली सैय्यद, हाजी जाकीर कुरेशी, आसीम मिर्झा, सोनू मुनाफ खाटीक, इसाक मलिक, शे. इकबाल राजू शेख, बाबुशेठ, होमगार्ड शे. शब्बीर शे तकबर आदि नागरिक उपस्थित होते. तर भडगाव पोलिस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक आनंद पठारे,  सुशील सोनवणे, पोलीस नाईक लक्ष्मण पाटील, प्रल्हाद शिंदे, हिरालाल पाटील, किरण ब्राह्मणे हजर होते.  यांच्याहस्ते गरजूंना शिरखुर्मा किटचे वाटप करण्यात आले. हा कार्यक्रम पोलीस निरीक्षक अशोक उतेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला.

 

Protected Content