मोटरसायकलवरून कोसळल्याने प्रौढाचा मृत्यू

यावल – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | यावल चोपडा मार्गावरील वढोदे गावाजवळ मोटर सायकलवरून कोसळल्याने ५४ वर्षीय प्रौढाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

या संदर्भातीत वृत्त असे की आज सोमवार, दि ४ जुलै रोजी सायंकाळी ६.३० ते ७ वाजेच्या सुमारास अशोक पद्दमाकर नेवे वय ५४ वर्ष राहणार साकळी तालुका यावल हे यावल येथून आपले काम आटोपून आपल्या (एमएच १९डी एक्स ५४८२) मोटर सायकलने साकळी गावी जात असतांना यावल चोपडा मार्गावरील वढोदे गावाजवळ अचानक त्यांच्या मोटर सायकलीवरून अशोक नेवे हे खाली कोसळले.

या अपघातात त्यांच्या डोक्यास गंभीर दुखापत झाली. नागरीकांच्या मदतीने अशोक नेवे यांना तात्काळ यावलच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. यावेळी ग्रामीण रुग्णालयाचे वेद्यकीय अधिक्षक डॉ.बी.बी.बारेला त्यांच्या आरोग्य कर्मचाऱ्यांनी त्यांच्यावर प्राथमिक उपचार केले असता नेवे यांची प्रकृती ही अधिक गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी तात्काळ भुसावळ येथील एका खाजगी रुग्णालयात नेट असतांना  रस्त्यात त्यांचा मृत्यू झाला.

Protected Content