वाळु माफीया आणी महसुल कर्मचारी यांच्यात वाद

यावल प्रतिनिधी | तालुक्यातील किनगाव येथे पुन्हा वाळु माफीया व महसुलच्या कर्मचाऱ्यांमध्ये वाळुची अवैध वाहतुक करणाऱ्या डंपर वाहनास अडविल्याने वाद झाल्याचे वृत्त असुन पोलीस निरिक्षक सुधीर पाटील यांच्यासह पोलीसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतल्याचे वृत्त हाती आले आहे.

दरम्यान तिन दिवसापुर्वी किनगाव गावात मंडळ अधिकारी सचिन जगताप आणी त्यांच्या महसुल कर्मचाऱ्यांच्या पथकाव्दारे गुप्त माहीतीचा आधार घेवुन आज पुन्हा अवैध वाळुची वाहतुक करणाऱ्या एमएच २८,७७०८या वाहनावर कारवाई करण्याचा प्रयत्न केला. यापुर्वीचअवैध वाळुची वाहतुक करणाऱ्या वाहनावर केलेल्या वादग्रस्त कारवाईमुळे गोंधळ निर्माण होवुन कर्मचाऱ्यावर जिवे ठार मारण्याचे प्रयत्न झाले होते. 

या घटनेच्या पार्श्वभुमीवर पोलीसांनी कडक कारवाई करीत या जिवे ठार मारण्याच्या गुन्ह्यातील आरोपींना अटक करण्यात आली होती , याच घटनेच्या गोंधळामुळे संतापाच्या भरात महसुल प्रशासन आणी वाळु माफीया यांच्यात संघर्ष निर्माण झाले असुन , आज दिनांक ४ मार्च रोजी रात्री ९.३० वाजेपासुन किनगावच्या बस स्टॅन्ड जवळच्या चौफुली पाँईटवर सुमारे चार पाचशे लोकांच्या उपस्थितीत मोठा दांगडो सुरू होता. या संदर्भात यावलचे तहसीलदार महेश पवार , किनगावचे मंडळ अधिकारी सचिन जगताप यांच्यासह तलाठी व महसुल कर्मचारी हे पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाले आहे.

 

 

Protected Content