आशादिप वसतीगृह गैरप्रकाराबाबत संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करा – वंचित बहुजन आघाडी

जळगाव प्रतिनिधी । जळगावातील आशादीप वसतीगृहात घडलेल्या गैरप्रकरणात संबंधित अधिकारी यांना निलंबित करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावे अशी मागणीचे निवेदन आज गुरूवारी ४ मार्च रोजी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील यांना देण्यात आले.

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शहरातल्या गणेश कॉलनी येथील आशादिप शासकीय वसतीगृहात झालेल्या गैरप्रकरणात पोलीस कर्मचारी आणि बाहेरच्या पुरूषांकडून नृत्यू करण्यास भाग पाडल्याचा गैरप्रकार समोर आला आहे. यासंदर्भात काही व्हिडीओ व्हायरल देखील झाले आहे. सदरील वसतीगृह हे महिला व बालकल्याण विभागामार्फे चालविण्यात येत आहे. त्याठिकाणी निराधार महिलांना सकस व पोष्टीक आहार पुरवला जात नाही. त्यांना डांबून ठेवणे, शारिरीक शोषण करणे अनेक दिवसांपासून होत असल्याचे दिसून येत आहे. सदरील गैरप्रकरणाची सीआयडी मार्फत चौकशी करण्यात यावी, गैरप्रकारणात असलेले संबंधित अधिकारी व कर्मचारी यांना निलंबित करण्यात यावे आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा दिलेल्या निवेदनात केले आहे. विविध मागण्यांचे निवेदन वंचित बहुजन आघाडीच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील यांना देण्यात आले.

दिलेल्या निवेदनावर वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रमोद इंगळे, सुजाता ठाकूर, डिगंबर सोनवणे, जितेंद्र केदार, गुरूनाथ सैंदाणे, कविता सपकाळे, पंचशिला आराख, संगिता मोरे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Protected Content